पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत; दुबार भात लागवडीचे संकट... दिलीप कांबळे
ऍग्रो वन

पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत; दुबार भात लागवडीचे संकट...

हवामान खात्याने या वर्षी समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला होता.

दिलीप कांबळे

दिलीप कांबळे

मावळ - मावळ Maval तालुका हा पुणे जिल्हाच्या पश्चिमेला कोकणपट्टी Kokan लगतचा तालुका असल्याने बारा हजार सहाशे हेक्टर वर भात पिकाची लागवड होते. असते. हवामान Weather खात्याने या वर्षी समाधानकारक पाऊस Rain पडेल असा अंदाज वर्तविला होता. Crisis of double paddy cultivation

हे देखील पहा -

त्यामुळे शेतकऱ्यांनी भाताच्या रोपांची पेरणी केली होती. जुन महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने भात रोपांची उगवण देखील च‍ांगल्या प्रकारे झाली होती. दरम्यान जुन महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत रिमझिम पाऊस सुरु राहिल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी भात रोपांची लागवड सुरु केली आहे.

काही ठिकाणी पारंपरिक पध्दतीने,काही ठिकाणी यांत्रिकीकरणाने तर काही ठिकाणी चार सुत्री पद्धतीने भात लावणीला वेग आला होता. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊसात वाढ होण्या येवजी कडक उन पडल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. Crisis of double paddy cultivation

ज्या ठिकाणी भाताच्या रोपांची लागवड झाली आहे.अश्या शेतामध्ये पाणी नसल्याने पिक वाया जाण्याची भिती आहे. तर तालुक्यात अनेक ठिकाणी भाताच्या रोपाची लागवड थांबली आहे. लवकर पाऊस सुरु न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे पिकांवर मोठा परिणाम होण्याची चिंता शेतकऱ्यांच्या चिंता सतावत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Army Recruitment: इंडियन आर्मीत नोकरीची संधी; ग्रुप सी पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

GST Reforms: ८ दिवसांत ४,००,००० वाहनांची विक्री, GST कपातीमुळे कार आणि दुचाकी विक्रीत जबरदस्त वाढ

Maharashtra Dasara Melava Live Update : देशाला आत्मनिर्भर होण्याची गरज - मोहन भागवत

Mohan Bhagwat: भारताचा आर्थिक विकास होतोय, पण गरीब- श्रीमंत यांच्यातील दरी वाढली: मोहन भागवत

Vishal Brahma : टायगर श्रॉफसोबत काम, अरबाजला नडला; ड्रग्समध्ये अडकलेला 'तो' अभिनेता कोण?

SCROLL FOR NEXT