Fraud Case Saam tv
ऍग्रो वन

लातूरात सोयाबीन खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक; महिलेसह तिघांविरुध्द गुन्हा दाखल

महिलेसह तिघांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर - जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार वारंवार होत असून नुकतेच लातूर मध्ये शेतकऱ्यांची तब्बल 85 लाख 15 हजार 345 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गोल्डस्टार ग्रो इंडिया लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून लातूर (Latur) जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या (Farmer) सोयाबीनची खरेदी करण्यात आली. बाजार भावापेक्षा अधिक भाव देण्याचे अमिष दाखवण्यात आले.

तब्बल 85 लाख 15 हजार 345 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे.

हे देखील पाहा -

या प्रकरणी लातूर येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात जगदीश सोमवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोयाबीनला प्रतिक्विंटल 8000 रुपये भाव देण्याचे आरोपींनी सांगितले. आयसीआयसीआय बँकचे धनादेश देखील २ शेतकऱ्यांना देण्यात आले. त्यांचे एमआयडीसीमधील गोदाम बंद होते. अनेक शेतकऱ्यांचे पैसे त्यांनी दिलेच नाहीत, अशी माहिती मिळाली. हे तिघेही आरोपी फरार झाले होते.

या तिन्ही आरोपींनी जगदीश सोमवंशी यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि तूर खरेदी करून तब्बल 85 लाख 15 हजार 345 रुपयांची फसवणूक केली होती. या फसवणूक प्रकरणी पोलिसांनी अतिक युसुफ शेख, कल्पना सांगवीकर, यशवंत नाडे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ATM Robbery : नाईटी, मास्क घालून आले अन् SBI चं एटीएम फोडले; २५ लाख घेऊन चोर पसार, CCTV पाहून पोलीसही चक्रावले

Water After Tea : चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिता? सावधान! होतात 'या' ३ गंभीर समस्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंवरील कारवाईच्या निषेधार्थ संभाजीनगरमध्ये ठाकरे शिवसेनेचे आंदोलन

Congress Protest Live Update : इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, दिल्लीतील वातावरण तापले

5 Potato Recipe: नवरात्रीच्या उपवासासाठी स्पेशल रेसिपी! बटाट्यापासून बनवा 5 उपवासाचे पदार्थ

SCROLL FOR NEXT