बोगस फ्लॉवर आणि पत्ता कोबी बियाणांमुळे लाखोंची फसवणूक
बोगस फ्लॉवर आणि पत्ता कोबी बियाणांमुळे लाखोंची फसवणूक गजानन भोयर
ऍग्रो वन

बोगस फ्लॉवर आणि पत्ता कोबी बियाणांमुळे लाखोंची फसवणूक

गजानन भोयर, साम टीव्ही वाशिम

वाशिम : वाशिम Washim जिल्ह्यातील आसरा पार्डी Asara Pardi येथील शिवाजी वानखेडे या शेतकऱ्याने farmer आपल्या २ एकर शेतात सकाटा या कंपनीच्या फ्लॉवर आणि पत्ता कोबीची Cabbage लागवड केली होती. मात्र, अडीच महिने होऊन सुद्धा कोबी पिकाला फुलच आले नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बियाणे कंपनीशी या संदर्भात संपर्क केला असता, शेतकऱ्याला उडवा- उडवीचे उत्तरे कंपनीकडून देण्यात आले आहे. तुमच्याकडून काय होते ते करा असे सांगण्यात आले आहे.

हे देखील पहा-

यानंतर शेतकऱ्याने कृषी विभाग Department of Agriculture ​आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली आहे. त्यामुळे लवकरात लवकर चौकशी करून, संबंधित कंपनी वर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकरयांनी केली आहे. वाशिम तालुक्यातील आसरा पार्डी येथील शिवाजी वानखेडे यांच्याकडे 18 एकर शेती आहे. वानखेडे हे वर्षभर भाजीपाला शेती करतात.

यंदा त्यांनी सकाटा या कंपनीची १ एकर फ्लॉवर आणि १ एकर पत्ता कोबीची लागवड केली. मात्र, या दोन्ही कोबीला फुलचं लागले नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मागील २ वर्षात कोरोनामुळे भाजीपाला पिकाच मोठे नुकसान झाले होते. आता लॉकडाऊन कमी झाल्यामुळे, त्यांना या फ्लावर आणि पत्ता कोबी मधून चांगल्या उत्पन्नाची अशा होती.

मात्र, बियाणे बोगस निघाल्याने लागवड खर्च तर वाया गेलाच, शिवाय ४ लाख रुपये मिळणार उत्पन्न मिळणार नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. बियाणे उगवले नाही किंवा बोगस निघाले तर जबाबदारी कंपनीची असते. मात्र, कंपनीकडे तक्रार केल्यानंतर कंपनी कडून शेतकऱ्यांना धमकावून तुमच्याकडून काय होते ते करा असे उत्तर मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी कृषी विभागात तक्रार केली आहे. मात्र ५ दिवस उलटूनही कृषी विभाग अजून शेतात पोहचला नसल्याने या शेतकऱ्यांना न्याय मिळेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | बारामतीत सुप्रिया सुळेंची गांधीगिरी! सुळेंनी गाठलं थेट अजितदादांचं घर

Special Report : मेरे पास माॅं है! अजित पवार सख्या भावाला असं का बोलले?

Superfood for Kids: रिकाम्या पोटी लहान मुलांना 'या' गोष्टी खायला दिल्यास बुद्धी होईल तल्लख

Live Breaking News: महायुतीच्या प्रमुख नेत्यांची उद्या मुंबईत बैठक

Maharashtra Lok Sabha: राज्यात तिसऱ्या टप्प्यात 54,09 टक्के मतदान, कोल्हापुरात सर्वाधिक, तर बारामतीत सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT