Buldhana News Saam tv
ऍग्रो वन

Buldhana News: ७ एकरातील हिरवीगार संत्रा बाग काही दिवसांतच पडली काळी; असं नेमकं घडलं तरी काय?

हिरवी संत्रा बाग झाली काळी, लाखोंचे नुकसान; उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत

संजय जाधव

बुलढाणा : जिल्ह्यातील संत्रा बागेवर रेड माईट रोगाने हल्ला चढवीला असून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे (Farmer) लाखोंचे नुकसान होत आहे. लोणार (Lonar) तालुक्यातील कारेगाव येथील विठ्ठल गायकवाड या शेतकऱ्याच्या ७ एकर संत्रा बागेतील रेड माईट रोगाने जवळपास १८ ते २० लाखांचे नुकसान झाल्याने त्यांनी सरकारने संत्रा उत्पादकांना तातडीने २ लाखांची पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. (Letest Marathi News)

बुलडाणासह विदर्भातील संत्रा बागांवर रेड माईट रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यात जळगाव जामोद, संग्रामपूर, लोणार या तालुका परिसरात हिरवी संत्रा बाग काळी- पिवळी पडली आहे.

यावर्षी संत्रा बागेवर रेड माईट रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ७ एकरातील संत्र्यांची फळे काळी पडल्याचे लोणार तालुक्यातील कारेगाव येथील संत्रा उत्पादक शेतकरी विठ्ठल गायकवाड यांनी सांगितले. संत्र्यांची फळं काळी पडल्याने ही फळं कोणताही व्यापारी घ्यायला तयार नाही. त्यामुळे यावर्षी लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. परिणामी जिल्ह्यातील फळबाग उत्पादकांचे चित्र विचित्र झाले आहे.

काही शेतकऱ्यांनी बांधलेली शेततळी कोरडी पडली. विहिरी व बोअरवेलन्सनी तळ गाठला. तरी फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यानी लाखो रुपये खर्चून टँकरने पाण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, दिवसेंदिवस खर्च आवाक्याबाहेर जात असल्याने शेतकरी हवालदिल झालेत. त्यातच रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे समाधानकारक व चांगल्या प्रतीचे उत्पन्न मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, सरकारने संत्रा उत्पादकांना तातडीने २ लाखांची पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी विठ्ठल गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' गैरसमज टाळा; तज्ज्ञांनी सांगितल्या केसांची योग्य काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक! मध्य आणि हार्बर मार्गावर होणार परिणाम; घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहाच

Maharashtra News Live Update: Pune: पर्वती पायथा येथे अनेक वर्ष जुने असलेले वडाचे झाड पडले

१६७० मधील लढाईनं बदलला पुण्यातील 'या' डोंगरी किल्ल्याचा इतिहास

8th Pay Commission: शिक्षकांचा पगार किती वाढणार? किती मिळणार पेन्शन?

SCROLL FOR NEXT