Buldhana News Saam tv
ऍग्रो वन

Buldhana News : कापूस विक्री करूनही अद्याप रक्कम मिळेना; व्यापारी फरार, शेतकऱ्यांचा घरासमोर गोंधळ

Buldhana News : मागील वर्षी मलकापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी शेतात पिकलेला हजारो क्विंटल कापूस मलकापूर येथील आरंभ ट्रेडिंग अडतं मालक डॉ. प्रफुल पाटील यांना विकला

संजय जाधव

बुलढाणा : एकत्र कापसाला अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकरी अडचणीत होता. यामुळे मिळेल त्या भावात विक्री करावी लागली. यात मलकापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी व्यापारी डॉ. प्रफुल पाटीलला हजारो क्विंटल कापूस विकला. मात्र अद्यापपर्यंत या शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्यात आलेली नाही. यामुळे शेतकर्त्यांकडून सदर व्यापाऱ्याच्या घरासमोर गोंधळ घालण्यात आला. 

मागील वर्षी मलकापूर (Malkapur) तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी शेतात पिकलेला हजारो क्विंटल कापूस मलकापूर येथील आरंभ ट्रेडिंग अडतं मालक डॉ. प्रफुल पाटील यांना विकला. त्या सर्व शेतकऱ्यांना दोन महिन्यात पैसे दिले जातील, असे सांगत सर्वांना चेक देण्यात आले होते. एक एक शेतकऱ्यांचा ५ लाख रुपयाचा तर कोणत्या शेतकऱ्याने ३ लाख रुपयाचा कापूस विकला होता. दिलेल्या चेकची तारीख निघून जात असल्याने शेतकऱ्यांनी (Farmer) प्रफुल पाटील यांच्या घरी जाऊन पैशाची मागणी केली.  

सदर कापूस (Cotton) विक्रीत शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. शेतकरी घरी गेले असता प्रफुल्ल पाटील घरी नसल्याने शेतकऱ्यांनी तिथे गोंधळ करीत संताप व्यक्त केला. त्यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. यानंतर शेकडो शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशन गाठले व पाटील यांच्याविरुद्ध तोंडी तक्रार दिली. कापूस विकत घेणारा डॉ. प्रफुल पाटील फरार झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे शेतकरी आता प्रचंड संतापला आले.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात वरुणराजाचा जलाभिषेक; वारकऱ्यांची एकच धावपळ

Pune : पुण्यात टँकरवर आता ऑनलाइन नजर, राज्यभर योजना राबवली जाणार, पाहा सरकरचा नेमका प्लान काय?

Samarth Movie: समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची आधुनिक काळाशी सांगड; 'समर्थ' चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

Palazzo Design for Monsoon: पावसाळ्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी पलाझो डिझाइन्स

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

SCROLL FOR NEXT