biloli farmer earns one lakh with chilli farming near nanded  saam tv
ऍग्रो वन

Success Story : बिलाेलीमधील शेतकऱ्याने एक एकरातील मिरची पिकातून कमावले लाख रुपये

मिर्ची लागवड केल्यानंतर दोन महिन्यानंतर फळ धारण सुरू झाली आहे. आता पुढे पाच ते सहा महिने मिर्चीचे उत्पादन शेतकऱ्याला मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी आनंदित आहे.

Siddharth Latkar

Nanded News :

- संजय सूर्यवंशी

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्याने एक एकरात मिर्चीची लागवड करून केवळ तीन महिन्यात साडेतीन लाखाचे उत्पन्न घेतले. नांदेड (nanded) जिल्ह्यातील बिलोली (biloli) तालुक्यातल्या कंगटी गावातील मनीष नरवाडे या शेतकऱ्याने हि किमया साधली आहे. (Maharashtra News)

मनीष नरवाडे यांनी शेतीत विविध प्रयाेग करण्याचा निर्धार केला. त्यांनी त्यांच्या शेतातील एक एकरात मिर्चीची लागवड केली. त्यासाठी मनीष नरवाडे यांना साधारण सव्वा लाख रुपये खर्च आला. त्यांच्याकडून 3 बाय 3 बेड पद्धतीने मिर्चीची लागवड करण्यात आली.

सध्या मिर्ची चांगला भर आला आहे. मिर्ची लागवड केल्यानंतर दोन महिन्यानंतर फळ धारण सुरू झाली आहे. आता पुढे पाच ते सहा महिने मिर्चीचे उत्पादन शेतकऱ्याला मिळणार आहे. नरवाडे यांनी पाच महिन्याआधी ही लागवड केली होती.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मागील तीन महिन्यात त्यांना साडेतीन लाखांचे मिर्चीचे उत्पादन मिळाले आहे. आगामी काळात त्यांना आणखी 3 ते 4 लाख रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा असल्याचे नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT