Lakhni Bajar Samiti Saam tv
ऍग्रो वन

Lakhni Bajar Samiti : शेतकऱ्यांना अनुदानात मिळणार बी- बियाणे, खत, अवजारे; लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीचा अनोखा उपक्रम

Bhandara News : कृषी केंद्र म्हटल की नेहमी शेतकऱ्यांची लूट केली जाते. खत, बी- बियाणे यांचे किमतीपेक्षा जास्त पैसे शेतकऱ्यांकडून घेतले जातात

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : लाखनी बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी अनोखा उपक्रम सुरू केला आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनुदानामध्ये बी- बियाणे, खते, अवजारे मिळणार आहेत. इतकेच नाही तर कृषी चिकित्सालय व कृषी माहिती केंद्र देखील सुरु करण्यात आले आहे. 

कृषी केंद्र म्हटल की (Bhandara) नेहमी शेतकऱ्यांची लूट केली जाते. खत, बी- बियाणे यांचे किमतीपेक्षा जास्त पैसे शेतकऱ्यांकडून घेतले जातात. तर खात व बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची लुबाडणूक देखील जाते. यावर मात करत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी (Lakhani) लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. बाजार समितीमध्येच कृषी तंत्रज्ञान, कृषी चिकित्सालय, कृषी माहिती केंद्र सुरू केलं आहे. 

जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम 

कृषी तंत्रज्ञान व चिकित्सालय सुरु केल्यामुळे (Bajar Samiti) शेतकऱ्यांनी कोणती बियाणे लागवड करावी किंव्हा शेती संबंधित माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना खत, बी, बियाणे, अवजारे अनुदान स्वरूपात दिला जाणार असुन याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. हा जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : आज राज्यभरात ११ दिवसांच्या गणपतींना निरोप देण्यात येणार

Healthy Rice : मधुमेहापासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत 'हे' ५ तांदळाचे प्रकार करतील अनेक आजारांवर मात

48 तासांचा अल्टिमेटम अन् आता ज्ञानेश कुमारांना हटवण्यासाठी इंडिया आघाडी मोठं पाऊल उचलणार

वर्धा हादरलं! मदतीच्या बहाण्याने फसवलं; रेल्वे स्थानकावर तरुणीवर सामूहिक अत्याचार

SBI ATM Rules: ऐकलं का! पुढील महिन्यापासून ATM मधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार; जाणून घ्या किती आकारला जाणार चार्ज

SCROLL FOR NEXT