Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Crop Insurance: अतिवृष्‍टीने नुकसान झाले, पंचनामे केले; पिक विम्याची रक्कम मिळेना

अतिवृष्‍टीने नुकसान झाले, पंचनामे केले; पिक विम्याची रक्कम मिळेना

अभिजीत घोरमारे

भंडारा : साहेब पंचनामे केले विम्याची रक्कम कधी मिळेल? अशी आर्त हाकेद्वारे भंडारा जिल्ह्यातील सर्वच शेतकरी (Farmer) विचारणा करीत आहेत. भंडारा जिल्हात तीनदा झालेल्या अतिवृष्टिने (Heavy Rain) जिल्ह्यातील भुईसपाट झालेले धान पिकासह भाजीपाला पिकाचे पंचनामे होऊन महिने ओलांडले. तरी सुद्धा पिक विम्याचे (Crop Insurance) पैसे अद्याप मिळाले नसल्याने त्यामुळे विम्याच्या फायदा कधी मिळणार असा संतप्त सवाल जिल्ह्यातील शेतकरी विचारत आहेत. (Breaking Marathi News)

भंडारा (Bhandara) जिल्हा धान उत्पादक जिल्हा असून मुख्य पिक धान पिक आहे. यंदा १ लाख ८७ हजार हेक्टरवर धान पिक लागवड केली असून जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढून घेतला आहे. विशेष म्हणजे हा विमा केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री फसल विमा योजनेतून काढला आहे. दरम्यान जिल्ह्यात ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात अतिवृष्‍टी झाली. यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिक सडून गेले, धान पिक करपले गेले. तर सततच्या पावसाने पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढला गेल्याने यात हजारो हेक्टरवरील जमिनीच्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

कंपनीचे पोट भरण्यासाठी विमा काढतो का

आपण काढलेला पिक विमा या नुकसानीला तारक ठरणार असे वाटत होते. मात्र नुकसानीचे पंचनामे होऊन महिने उलटून गेले तरी विमा कंपनीद्वारे विम्याची रक्कमची अद्याप ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. वेळोवेळी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रात्र जागून रांगाच्या रांगा लावत पिक विम्या काढला. एक एक कागद जमा करत पिक विम्या भरला. मात्र जेव्हा मोबदला देण्याची वेळ आली; तर कंपनी पुढे यायला तयार नाही. त्यामुळे कंपनीचे पोट भरण्यासाठी आम्ही पिक विमा काढतो का? असा संतप्त सवाल जिल्ह्यातील शेतकरी विचारत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

SCROLL FOR NEXT