Bhandara News Saam tv
ऍग्रो वन

Bhandara News : भंडाऱ्यात १९ कृषी केंद्रांना खत, बियाणे विक्रीवर बंदी; कृषी विभागाच्या तपासणीत आढळल्या त्रुटी

Bhandara News : खरीप हंगाम सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाकडून भरारी पथक तयार करण्यात आले आहेत

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

भंडारा : शेतकऱ्यांना बि- बियाणे व खत विक्रीत निष्काळजीपणा करणाऱ्या बियाणे विक्री करणारे १२ आणि खत विक्री करणाऱ्या ७ कृषी केंद्रांना विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कृषी विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे.

खरीप हंगाम सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाकडून भरारी पथक तयार करण्यात आले आहेत. या पथकांकडून कृषी केंद्रांवर नजर ठेवण्यात येत होती. यात प्रामुख्याने बियाणांची जादा दराने विक्री, खत विक्रीवर देखील नजर ठेवण्यात येत होती. या अनुषंगाने कृषी केंद्रांची तपासणी देखील सुरु होती. (Bhandara) यात काही कृषी केंद्रांवर त्रुटी आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. 

जिल्ह्यात खरीप हंगामाला जोमाने सुरुवात झाली आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावर बियाणे आणि खतांच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. या काळात शेतकऱ्यांची गरज ओळखून कृषी केंद्र संचालक नियम पायदळी तुडवीत असल्याचे तपासणी दरम्यान कृषी विभागाच्या लक्षात आले. भरारी पथकांमार्फत करण्यात येत असलेल्या कृषी केंद्राच्या तपासणीत त्रुटी आढळून आल्या. यामुळे जिल्ह्यातील १९ केंद्रांवर खत व बियाणे विक्रीस बंदी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राळेगाव प्रकरणातील संशयित आरोपी मजहर कुरेशीच्या घरावर जमावाकडून दगडफेक

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

SCROLL FOR NEXT