भंडाऱ्याच्या शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र! शेती परवडत नाही म्हणून वाईन... 
ऍग्रो वन

भंडाऱ्याच्या शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र! शेती परवडत नाही म्हणून वाईन...

किराणा दुकानात वाइन विकायची परवानगी दिली न तशीच परवानगी आम्हाला ही द्या, अशी अजब मागणी

अभिजीत घोरमारे

भंडारा: गजब! मुख्यमंत्रीसाहेब गेल्या वर्षापासून शेतीत उत्पन्न होत नसल्याने शेती परवडत नाही, म्हणून किराणा दुकानात वाइन विकायची परवानगी दिली न तशीच परवानगी आम्हाला ही द्या, अशी अजब मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील शेतकऱ्यांने (farmers) केली असून अशा प्रकारचे पत्रही शेतकऱ्याने चक्क मुख्यमंत्री (CM) यांना पाठवून दिले आहे. त्याच्या या अजब मागणीची जिल्ह्यामध्ये (district) मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे.

हे देखील पहा-

कारण त्यावेळेस चक्रीवादळ (Hurricane) आला होता. त्यात जयगुनाथ सहगावातील अनेक शेतकऱ्यांची धानाची शेती भुई सपाट झाली होती. पंचनामे झाले तरी एवढे दिवस लोटूनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि नुकसान भरपाईचा लाभ मिळालेला नाही. या प्रकरणी गावातील (village) शेतकऱ्यांनी वेळोवेळी अधिकाऱ्यांसमोर आपली कैफियत मांडून तातडीने नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली. या विषयावर अजूनही शासनाने कोणताही तोडगा काढला नाही. त्यात अड़चन कमी होती कि क़ाय शासनाने गेल्या वर्षापासून धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देने बंद केले. या संपूर्ण अडचणींमुळे शेतकऱ्यांना आर्थिक चटके बसत असल्याचे गाढवे यांचे म्हणणे आहे.

शेतात पिक घेताना लागत असलेले खत, यूरिया व मिळत असलेले उत्पन्न यामध्ये तारतत्म्य बसले नाही, तर दूसरीकडे मुलांना शाळेत पाठवायला लागत असलेला शैक्षणिक खर्च, कुटुंबाच्या आरोग्यावर होणार खर्च हे सर्व शेतीच्या उत्पन्नमधुन करने शक्य होत नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीसाहेब आपण किराणा दुकानात वाईन विकायची परवानगी दिली, तशी मलाही कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लवकरात लवकर मला वाईन विक्रीची परवानगी मिळावी, अशी मागणी गाढवे यांनी मुख्यमंत्री यांना पत्रात केली आहे. गाढवे यांनी तशा आशयाचे पत्र चक्क स्पीड पोस्टने केले आहे. आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना चक्क वाईन विक्रीची परवानगी मागण्यासाठी पत्र भंडाऱ्यातील शेतकऱ्याने पाठविल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अजब गजब मागणीची चर्चा जिल्ह्यात होऊ लागली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priya Bapat : प्रिया बापटचा भन्नाट परफॉर्मन्स; लाईव्ह कॉन्सर्टमधील गाण्याचं होतंय कौतुक

Maharashtra News Live Updates: अंधेरी पश्चिमेतील एका इमारतीला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Viral Video: भीषण वास्तव! इंजीनियरिंगची फी भरण्यासाठी पैसे नाहीत तरुणाने केली तब्बल ५४ मोबाईलची चोरी; घटनेचा CCTV व्हायरल

Maharashtra Air Pollution: सांगलीकर लय भारी, हवा सर्वात शुद्ध; मुंबई-पुण्याला टाकले मागे

IIM Placement: 'IIM मुंबई' लय भारी; आतापर्यंत २७६ मुलांची कॅम्प्स प्लेसमेंटद्वारे भरती; मिळाले लाखोंचे पॅकेज

SCROLL FOR NEXT