Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price : बीडच्या माजलगावमध्ये १८ हजार ३८७ क्विंटल कापसाची खरेदी; साडेसात हजाराचा मिळतोय हमीभाव

Beed Majalgaon Cotton Market : माजलगाव तालुक्यामध्ये खरिपाचे ८९ हजार हेक्टरावर क्षेत्र असून यापैकी ७८ हजार हेक्टर क्षेत्र हे पेरणी लायक आहे. यातील ६० हजार हेक्टरव क्षेत्रावर शेतकऱ्यांनी खरिपातील तूर, सोयाबीन, मूग, उडीद व कपाशीची पेरणी केली होती.

Rajesh Sonwane

बीड : शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापसाची बीडच्या माजलगावात १ लाख क्विंटल खाजगी व शासकीय खरेदी केंद्रावरून खरेदी करण्यात आली आहे. यात कापसाला ७ हजार ५५५ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव मिळत आहे. परंतु लागवडीपासून ते वेचणीपर्यंत केलेल्या खर्चाचे व मिळत असलेल्या अत्यल्प दराचे कुठेही गणित जुळत नसल्याने शेतकऱ्यांना कापसाच्या वाढीव दराची प्रतीक्षाच आहे.

यंदाच्या हंगामातील लागवड करण्यात आलेल्या कापूस खरेदीला दिवाळीनंतर सुरवात झाली आहे. यंदा माजलगाव तालुक्यामध्ये खरिपाचे ८९ हजार हेक्टरावर क्षेत्र असून यापैकी ७८ हजार हेक्टर क्षेत्र हे पेरणी लायक आहे. यातील ६० हजार हेक्टरव क्षेत्रावर शेतकऱ्यांनी खरिपातील तूर, सोयाबीन, मूग, उडीद व कपाशीची पेरणी केली होती. यामध्ये २७ हजार ११९ हेक्टरवर कपाशीची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. 

अतिवृष्टीने नुकसान 

दरम्यान यंदा राज्यातील अनेक भागात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यानुसार बीड जिल्ह्यात देखील या दोन महिन्याच्या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस व सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अर्थात यात शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून कापसाच्या कमी दरामुळे हा खर्च निघणे देखील कठीण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना भाव वाढीची अपेक्षा लागून आहे. 

एक लाख क्विंटलची खरेदी 

बीडच्या माजलगाव तालुक्यात आतापर्यंत शासकीय अन् खाजगी खरेदी केंद्रावर ७ हजार ५०० रुपये दराने १ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. साडेसात हजार दर मिळत असल्याने यातून खर्च निघत नाही. यामुळे केलेला खर्च आणि मिळत असलेला भाव याचे कुठेही गणित जुळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळं हमीभावात वाढ करून १० ते १२ हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Exclusive : मला मारण्याचं षडयंत्र रचलंय; मनोज जरांगेंचा फडणवीस सरकारवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम

Dhananjay Munde : मोठी बातमी! धनंजय मुंडेंची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?

Saree Draping : डाव्या की उजव्या? साडीचा पदर कोणत्या बाजूला काढावा? जाणून घ्या

Maharashtra Police Recruitment: मोठी बातमी! राज्यात ८१०० पोलिसांची भरती, अनेकांचे पोलिस होण्याचं स्वप्न होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT