Beed News Saam tv
ऍग्रो वन

Beed News: दीड कोटीचा गजेंद्र रेडा ठरतोय आकर्षण; कृषी महोत्सवात पहायला शेतकऱ्यांची गर्दी

दीड कोटींचा गजेंद्र रेडा ठरतोय आकर्षण; कृषी महोत्सवात पहायला शेतकऱ्यांची गर्दी

विनोद जिरे

बीड : बीडच्या गेवराईत ४ दिवशीय कृषी महोत्सवाला सुरुवात झाली. गेल्या १५ वर्षांपासून सुरू असलेल्या कृषी महोत्सवात यंदा मात्र एक (Beed News) वेगळी चर्चा आहे. या कृषी महोत्सवात गजेंद्र नावाचा रेडा हा मुख्य आकर्षण ठरत आहे. ज्याचे वजन हे दीड टन असून त्याला दीड कोटींची मागणी आहे. विशेष म्हणजे या गजेंद्रला पाहण्यासाठी शेतकरी (Farmer) मोठी गर्दी करत आहेत. (Letest Marathi News)

कृषीरत्न स्व. गणेशराव बेद्रे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी कृषी महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा या कृषी महोत्सवातील प्रदर्शनासाठी तब्बल १८० स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये शेतकरी उपयोगी सर्व साहित्यांसह विविध उपकरणे असणारे स्टॉल लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यात पशुधन आणि दुग्ध विषयक शेती करण्यासाठी आवड निर्माण व्हावी. यासाठी मुख्य आकर्षण म्हणून कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील गजेंद्र रेडा देखील आणण्यात आलाय. अशी माहिती आयोजक महेश बेंद्रे यांनी दिली

३ किलो सफरचंद अन्‌ १५ लिटर दूध

दरम्यान गजेंद्र रेड्याला विविध राज्यातून मागणी आहे. तो दीड टन वजनाचा असून दीड कोटीला मागण्यात आला आहे. त्याला आहार म्हणून आम्ही दूध १५ लिटर, सफरचंद ३ किलो यासह हिरवा चारा दररोज लागत असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणीला मुख्यमंत्र्यांकडून खास पोशाख | VIDEO

Bhandara News : नवं घर बांधल्याचा आनंद गगनात मावेना! रोज नव्या घरी झोपायला जायचे, एका रात्री आक्रित घडलं अन्...

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरातील महात्मा फुले चौकात भीषण अपघात

Uttar Pradesh Heartbreaking : शाळेचा पहिला दिवस, कारमधून उतरला अन् धाडकन जमिनीवर कोसळला; १२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Nilesh Sable: निलेश साबळेला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून का हटवलं, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT