Soyabean Saam tv
ऍग्रो वन

Majalgaon News : नाफेड खरेदी केंद्रावर शेतकरी मुक्कामीच; खरेदी केंद्रावर वाहनाच्या लांब रांगा

Beed News : वेळेवर माप व्हावे, यासाठी गर्दी वाढत असतांना मात्र केंद्र चालकाकडुन कसल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना आठ दिवसांपासून बसण्याची वेळ येत आहे

Rajesh Sonwane

बीड : हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यासाठी नाफेड अंतर्गत शासकीय खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. या केंद्रांवरील खरेदी बंद झाली असून येथे नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनने भरलेल्या वाहने अजूनही नाफेडच्या खरेदी केंद्राबाहेर उभी आहेत. याठिकाणी सोयाबीन भरलेल्या वाहनांची तीन किलोमीटर लांब रांगा लागलेल्या पाहण्यास मिळत आहेत. 

बीड जिल्ह्यातील माजलगांव येथील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदीसाठी अवघे चार दिवस शिल्लक राहिल्याने शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. वेळेवर माप व्हावे, यासाठी गर्दी वाढत असतांना मात्र केंद्र चालकाकडुन कसल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. परिणामी शेतकऱ्यांना आठ दिवसांपासून बसण्याची वेळ येत आहे. नाफेडच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत. 

करावा लागतोय गैरसोयीचा सामना 

माजलगाव तालुक्यातील हरभरा, सोयाबीन व इतर धान्य उत्पादक शेतकऱ्यांकरीता एकच शासकीय खरेदी केंद्र तसेच एकच खरेदी केंद्र आहे. त्यातही बारदाण्या अभावी अथवा कुल्याही कारणांमुळे नेहमीच बंद असल्याने शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नोंदणी करून महिना उलटला तरी देखील अनेकांना मॅसेज न आल्याने सोयाबीन खरेदी केंद्रावर आणता आले नाही. शेतकऱ्यांना इतर कामे सोडुन शासकीय खरेदी केंद्रावर मुक्काम करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

धाराशिव जिल्ह्यात २० हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदीविना पडून
धाराशिव
: राज्य सरकारने हमीभाव खरेदी केंद्राची मुदत संपल्याने केंद्र बंद केल्याने धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. जिल्ह्यात ३५ हजार ४०० शेतकऱ्यांच्या नोंदणी पैकी १५ हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी झाली आहे. जिल्ह्यात ३ लाख ७५ हजार क्विंटल सोयाबीन खरेदी झाली असुन आणखी २० हजार शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी विना पडून आहे. सोयाबीनला कमी असलेला भाव आणि बंद झालेली हमीभाव खरेदी केंद्र यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT