Beed News Saam tv
ऍग्रो वन

Beed News : सर्वच अकरा तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती; शेतकरी संकटात

Beed News : सर्वच अकरा तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती; शेतकरी संकटात

विनोद जिरे

बीड : यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाला नाही. बीड जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती असल्याने अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. (Beed) बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती असून केवळ तीनच तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यातील (Farmer) शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिल्ने कठीण आहे. (Breaking Marathi News)

बीड जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती आहे. मात्र सरकारकडून केवळ वडवणी, धारूर आणि अंबाजोगाई या तीन तालुक्यातच दुष्काळ जाहीर केला. बीड जिल्ह्यात सध्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याचबरोबर दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे पिकाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. यामुळे खर्च झालेला देखील शेतकऱ्यांना निघणार नाही. त्यात आता सरकारने बीड जिल्ह्यातील ११ पैकी केवळ ३ तालुक्यातच दुष्काळ जाहीर केल्याने पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोरडा दुष्काळ सदृश परिस्थिती असताना जिल्ह्यातील तीनच तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्यामुळे शेतकरी आणि शेतकरी नेते आक्रमक झाले आहेत. बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी; अशी मागणी शेतकरी आणि शेतकरी नेत्यांमधून केली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT