Beed News Saam tv
ऍग्रो वन

Beed News : युरिया साठ्यात तफावत, कृषी केंद्राचा परवाना निलंबित; बीडमध्ये कृषी विभागाची कारवाई

Beed News : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात कृषी दुकानांची तपासणी केली जात आहे. या दरम्यान शेतकऱ्यांना योग्य दरात बी- बियाणे खते दिली जातात का? याची देखील पाहणी केली जात आहे

विनोद जिरे

बीड : बीडमध्ये कृषी विभाग ऍक्शन मोडमध्ये आला असल्याचे पाहण्यास मिळाले. चौसाळा येथील अमोल कृषी सेवा केंद्राकडून खत नियंत्रण आदेशातील तरतुदीचा व परवान्यातील अटी व शर्तीचा भंग केल्याचे दिसून आला. त्याचबरोबर युरिया खताच्या साठ्यात तफावत आढळल्याने अमोल कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आला. जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी ही कारवाई केली.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात कृषी दुकानांची तपासणी केली जात आहे. या दरम्यान शेतकऱ्यांना योग्य दरात बी- बियाणे खते दिली जातात का? याची देखील पाहणी केली जात आहे. शिवाय आता कृषी केंद्रांवर खतांचा पुरवठा होत असून याची देखील तपासणी कृषी विभाग करत आहे. यासाठी कृषी विभागाने काही अटी आणि शर्ती घालून दिल्या आहेत. कृषी केंद्रांकडून याचे पालन होते कि नाही हे देखील तपासले जात आहे.  

दरम्यान बीडमधील (Beed) अमोल कृषी केंद्रावर तपासणी केली असता कृषी विभागाने लावलेले नियम डावलल्याचे निदर्शनास आले. शिवाय खतांच्या साठ्यात तफावत आढळून आल्याने अमोल कृषी सेवा केंद्रावर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या कारवाईने नियम पायदळी तुडवून कृषी दुकाने चालवणाऱ्या कृषी दुकानदाराचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मी मुंबईला जाणार - मनोज जरांगे

...तर OBC साठी स्वतंत्र पक्ष काढणार; बड्या नेत्याचा सरकारला इशारा, पडळकरांवरही हल्लाबोल

Kalwa Tourism : येणारा वीकेंड कुटुंबासोबत प्लान करा, फिरा कळव्याजवळचे ५ मस्त मान्सून पिकनिक स्पॉट्स

Manoj Jarange: लाठीचार्ज झाला तर सरकार पडेल, मुंबईतील आंदोलनाबाबत मनोज जरांगेंची मोठी घोषणा

Thursday Horoscope: करिअरमध्ये प्रगती अन् अचानक धनलाभ; या ६ राशींना मिळणार आनंदाची बातमी, वाचा गुरुवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT