hurda party  SaamTv
ऍग्रो वन

Beed : ग्रामीण भागातील हुर्डा पार्ट्यांमुळे स्थानिकांना मिळतोय रोजगार!

शेतातील ज्वारी बहरात आल्यानं खवय्यांना हुर्डा पार्टीचे (Hurda Party) वेध लागले आहे.

विनोद जिरे

बीड : "ज्वारी बहरात, हुरडा पार्ट्या जोरात' अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे. डिसेंबरच्या अखेरीस आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेतातील ज्वारी बहरात येते. शेतातील ज्वारी बहरात आल्यानं खवय्यांना हुर्डा पार्टीचे (Hurda Party) वेध लागले आहे. गुलाबी थंडीत सध्या बीड (Beed) मध्ये हुर्डा पार्टीची रेलचेल सुरू झालीय. चुलीवरच्या गरमा गरम बाजरीच्या भाकऱ्या, पिठलं, थालीपीठ, झणझणीत ठेचा अशा गावरान मेव्याची चव पर्यटकांना चाखायला मिळत आहे.

हे देखील पहा :

बीड बायपास जवळील हिरकणी हुर्डा केंद्रावर, केवळ मराठवाडाच (Marathwada) नाही तर इतर राज्यातील पर्यटक गर्दी करत आहेत. मुलांच्या खेळण्याची सोय असल्यानं, लहानगे देखील याचा मनमुराद आनंद लुटतायत. इथला सेल्फी पॉईंट पर्यटकांना आकर्षित करतोय, दुष्काळी बीड जिल्ह्यात हे चित्र समाधान देणार आहे.

गत दोन वर्षांपासून हुरडा पार्टीवर निर्बंध होते. परंतु, यंदा हुर्डा पार्टीचा आस्वाद घेता येत असल्यानं, पर्यटक (Tourist) देखील मोठ्या उत्साहाने यात सहभागी होताना दिसून येत आहे. तर, दुष्काळी मानल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यात पर्यटनातून स्थानिकांना रोजगार मिळत असल्यानं त्यांच्यात देखील उत्साह दिसून येत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लाडक्या बहिणी पासून सुरू झालेली सरकारची सुरुवात लाडक्या कंत्राटदार पर्यंत येऊन पोहोचली-विजय वडेट्टीवार

Mumbai Travel : 'ख्रिसमस'चा दिवस होईल खास, जोडीदारासोबत मुंबईतील 'या' ठिकाणी घालवा निवांत वेळ

Tapovan Trees Cutting: मुंडेंचा आत्मदहनाचा इशारा! ही लढाई कुठल्याही धर्माची नाही तर निसर्गाच्या रक्षणाची

Pune Land Scam Case: पुणे पोलिसांकडून शितल तेजवानीच्या घराची झाडाझडती; महत्त्वाचे कागदपत्रे जप्त, कालाचिठ्ठा येणार बाहेर

Fruit Kheer Recipe : भूक लागलीय? गोड खावंसं वाटतंय? झटपट बनवा हेल्दी फ्रूट खीर

SCROLL FOR NEXT