Beed विनोद जिरे
ऍग्रो वन

ऊसाचं पाचट जाळतांना, शेजारच्या शेतकऱ्यांच्या ऊसाला लागली भीषण आग

अवघ्या काही वेळात जवळपास 5 एक्कर ऊस जळून खाक

विनोद जिरे

बीड: महावितरणच्या (MSEDCL) गलथान कारभारामुळे शॉर्टसर्किट होऊन अनेक शेतकऱ्यांचे (farmers) ऊस जळाल्याच्या घटना आपण पाहिल्या असतील. मात्र, बीडमध्ये (Beed) अशी एक घटना समोर आली आहे, की त्याची बातमी पाहून आपणही चक्रावून जाणार आहे. आपल्या शेतातील उसाचे पाचट जाळण्याच्या नादात, शेजारच्या शेतकऱ्यांना याची मोठी किंमत मोजावी लागली आहे.

हे देखील पहा-

ऊसाचे (Sugarcane) पाचट जाळत असतांना, लावलेली आग क्षणात मोठी झाली अन् शेजारच्या ४ शेतकऱ्यांचा जवळपास ५ एकर ऊस जळून खाक झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना बीडच्या खापर पांगरी गावात (village) उघडकीस आली आहे. बीडच्या खापर पांगरी गावातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील ऊसाचे पाचट पेटवले आहे.

मात्र, काही क्षणात वाऱ्याने आग पांगली गेली. आणि यातच शेजारच्या ऊसाला भीषण आग (Fierce fire) लागली. अशी प्राथमिक माहिती ग्रामस्थांनी (villagers) दिली आहे. तर या लागलेल्या भीषण आगीत विठ्ठल खामकर, बाळू खामकर, नारायण खामकर, सुधाकर चव्हाण या ४ शेतकऱ्यांचा जवळपास ५ एक्कर ऊस जळून खाक झाला आहे. यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचं नुकसान झाले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fort : अलिबागला गेल्यावर 'हा' ३०० वर्षे जुना समुद्री किल्ला पाहाच, ओहोटीच्या वेळी चक्क चालत जाता येतं

Liver disease symptoms: लिव्हर खराब होत असल्यास तुमच्या त्वचेवर दिसतात 4 लक्षणं; शरीरात दिसणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करू नका

Maharashtra News Live Update : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाला सुरुवात, वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

Oil Price : खाद्यतेलाच्या दरांबाबत केंद्राचा मोठा निर्णय; कंपन्यांना MRP कमी करण्याचे निर्देश

Onion Oil Vs Rosemary Oil: कांद्याचे तेल की रोझमेरी तेल, केसांच्या वाढीसाठी कोणते तेल फायदेशीर?

SCROLL FOR NEXT