शेतकऱ्यांच्या सर्जा-राजाच्या अस्तित्वाची लढाई; भव्य बैलगाडा शर्यतीची जोरदार तयारी... विजय पाटील
ऍग्रो वन

शेतकऱ्यांच्या सर्जा-राजाच्या अस्तित्वाची लढाई; भव्य बैलगाडा शर्यतीची जोरदार तयारी...

सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे मध्ये जोरदार तयारी सुरू

विजय पाटील

सांगली - महाराष्ट्रमध्ये Maharashtra बैलगाडा शर्यतीवर Bailgada Sharayat बंदी असल्याने शेतकऱ्यांचे सर्जा-राजा कुठेतरी कालवश होत चालले आहे. ही बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. तर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar यांनी बैलगाडी शर्यतीसाठी कंबर कसली आहे. परवानगी नाही मिळाली तरी देखील बैलगाडा शर्यत होणारच असा निश्चय करून सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे मध्ये जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

तर बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी या मागणीसाठी महाराष्ट्रातले शेतकरी आता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण चांगलेच तापले आहे. नुकताच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत सुरू व्हावी यासाठी आंदोलन हाती घेतले आहे.

येत्या 20 ऑगस्टला सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे गावी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहेत. त्याची जय्यत तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. बैलांच्या पळण्यासाठी धावपट्टीचे बनवण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत.

प्रशासनाने परवानगी दिली नाही तरी आम्ही शर्यत करणारच असा निर्धार करून ही तयारी सुरु करण्यात आली आहे. तर या बैलगाडा शर्यतीला पाठिंबा देण्यासाठी अनेक शेतकरी सामाजिक संघटना निवेदना द्वारे पाठिंबा देत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई नाशिकमध्ये दाखल

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

SCROLL FOR NEXT