Aurangabad News Saam Tv
ऍग्रो वन

औरंगाबाद विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाची मोठी कारवाई; ५४ बियाणे विक्रेत्यांचे परवाने निलंबित

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामात फसवणाऱ्या बियाणे आणि खते विकणाऱ्या दुकानदारावर औरंगाबादच्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय मोठी कारवाई केली आहे. औरंगाबाद, जालना (Jalna) आणि बीड (Beed) जिल्ह्यांतील तब्बल ५४ बियाणे विक्रेत्यांचे परवाने कृषी विभागाने निलंबित केल्यानं खळबळ उडाली आहे. या बियांनाच्या दुकानासोबत खत विक्रीच्या एका दुकानाचाही समावेश आहे. (Aurangabad Latest News In Marathi)

कृषी विभागाच्या तपासणीत औरंगाबाद, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांतील खत, बियाणे आणि कीटकनाशकांच्या तपासणी दरम्यान त्रुटी आढळून आल्याने कृषी विभागाने ही कारवाई केली आहे. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईने खते, बियाणे आणि कीटकनाशके विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते आणि कीटकनाशके मिळावीत, यासाठी कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी जिल्ह्यातील परवानाधारक खते, बियाणे आणि कीटकनाशके विक्रेत्यांकडे असलेल्या खते, कीटकनाशके आणि बियाण्यांचे नमुने घेऊन त्यांची प्रयोगशाळेत तपासणी करतात. या तपासणीमध्ये खते कीटकनाशके अथवा बियाणे बनावट आढळल्यास अथवा ते प्रमाणित नसेल तर साठा जप्त केला जातो.

बनावट खते अथवा बियाण्यांची विक्री करताना आढळल्यास कृषी विभागाकडून पोलीस कारवाईही केली जाते, त्यामुळे मराठवाड्यातील या तीन जिल्ह्यात विभागीय कृषी गुण नियंत्रण विभागांना ही मोठी कारवाई केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रात आज दिवसभर कोसळणार पाऊस; छत्रपती संभाजीनगरसह या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Rashi Bhavishya : या राशींच्या व्यक्तींना सापडणार योग्य दिशा, भाग्य राहणार दारात उभे; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज 'या' राशींच्या भाग्यात होणार मोठा बदल, तुमची रास?

Maharashtra Assembly Election: राज्यात दोन दिवसांत विधानसभा निवडणूक होणार जाहीर? केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात दाखल

Israel Lebanon War: पश्चिम आशियात युद्धाचा भडका, इस्त्राईल-लेबनॉन संघर्ष कधी थांबणार?

SCROLL FOR NEXT