Cotton Seeds Saam tv
ऍग्रो वन

Cotton Seeds Shortage : अमरावती जिल्ह्यात कपाशीच्या बीटी बियाणांचा तुटवडा; एका शेतकऱ्याला मिळतात फक्त दोन पाकिटे

Amravati News : मान्सून तोंडावर असल्याने शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची तयारी सुरु झाली आहे. तसेच मान्सूनपूर्व लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदी करून लागवड करण्यास सुरवात करण्यात आली

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: विदर्भात मान्सूनपूर्व कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या लागवडीसाठी कपाशीच्या बीटी अजित १५५  या वाणांची मागणी शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात होत असताना कंपनीकडून याचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने कृषी सेवा केंद्रात तुटवडा निर्माण झालेला आहे. मागणी पेक्षा पुरवठा कमी झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. 

मान्सून तोंडावर असल्याने शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची तयारी सुरु झाली आहे. तसेच मान्सूनपूर्व लागवड करणाऱ्या (Farmer) शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदी करून लागवड करण्यास सुरवात करण्यात आली आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांकडून कापसाच्या बीटी अजित १५५ या वाणाला अधिक मागणी असते. त्यादृष्टीने जिल्ह्यासाठी मागणी करण्यात येत असते. सदर कंपनीकडे अडीच लाखांवर (Amravati) पाकिटांची मागणी नोंदविण्यात आल्यानंतर जिल्ह्यासाठी फक्त ६५ हजार पाकिटांचे कंपनी कडून पाठवण्यात आले आहे. परिणामी या बियाण्याचा तुटवडा जाणवत आहे. 

कृषी विभागाच्या निगराणीत कपाशीच्या अजित १५५ या बियाणाचे पाकीट एक शेतकऱ्याला दोन पाकीट असे वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे बीटी अजित १५५ या कपाशीच्या बियाणांचा तुटवडा मार्केटमध्ये निर्माण झालेला आहे. कंपनीकडून या बियाण्याचा पुरवठा कमी होत असताना शेतकऱ्यांनी याची मागणी मोठ्या प्रमाणात केल्यामुळे याचा तुटवडा भासत आहे .कपाशीच्या बीटी बियाणांच्या पाकिटाची एमआरपी ८६७ रुपये असताना ग्रामीणमध्ये ९०० ते १२०० रुपयांप्रमाणे विक्री होत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Crime: नागपूर हादरले! सैनिकी स्कूलमध्ये विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार, शाळेच्या संचालकाला अटक

Manoj Jarange Strike : मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उपोषणाचं ठिकाण बदललं; बावनकुळेंनंतर आणखी एका मंत्र्यांवर गंभीर आरोप

Cyber Crime : सावधान! मोबाइलवरील जाहिरातीवर क्लिक करताच बँक अकाउंट खटाखट झालं रिकामं, काय आहे हा स्कॅम? वाचा

MNS Student Sena And ABVP Fight: साठ्ये कॉलेजबाहेर तुफान हाणामारी; मनविसे आणि ABVPचे कार्यकर्ते भिडले

Shivsena Hearing: शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? सुप्रीम कोर्टाचा सवाल, सुनावणीत नेमका काय युक्तिवाद झाला?

SCROLL FOR NEXT