Orange Farm Saam tv
ऍग्रो वन

Orange Farm : अमरावती जिल्ह्यात संत्र्याची मोठी फळगळ; शेतकऱ्यांचे लाखोंची नुकसान

Amravati News : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, चांदुर बाजार या तालुक्यात सर्वाधिक संत्र्याच्या बागा आहेत

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: वातावरणात झालेला बदल, रोग व किडींचा प्रादुर्भाव आणि अतिपावसामुळे संत्रा फळांची मोठी फळगळ होत आहे. झाडावरील अर्ध्यापेक्षाही अधिक संत्रा हे जमिनीवर आल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. 

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या (Amravati) अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, चांदुर बाजार या तालुक्यात सर्वाधिक संत्र्याच्या बागा आहेत. या भागातील संत्रा हा आपल्या विशिष्ट चवीने प्रसिद्ध असून नागपुरी संत्रा या नावाने देशात नव्हे तर बाहेर देशात याची मागणी असते. मात्र आता या संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळगळ सुरू असल्याने निम्म्यापेक्षाही कमी संत्र झाडावर शिल्लक असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

५० अनुदानावर औषधी मिळावी 
केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेचे व कृषी विभागाचे उदासीन धोरण याला जबाबदार आहे. आम्हाला त्यांच्याकडून कोणते प्रकारचे मार्गदर्शन होत नाही. यावर कोणती फवारणी करायची; याच सुद्धा आम्हाला मार्गदर्शन होत नसल्याचा आरोप (Farmer) शेतकऱ्यांनी केला आहे.  त्यासोबतच बाजारात महागडे कीटकनाशके, बुरशी नाशके असून ती आम्हाला परवडत नाही. त्यामुळे ५० टक्के अनुदानावर ही औषधे शासनाने उपलब्ध करून द्यावी; अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway jobs : ग्रॅज्युएशन झालंय? रेल्वेत करा नोकरी, ५८०० जागांसाठी निघाली मेगा भरती, वाचा A टू Z माहिती

Skin Care: ड्राय स्किनला करा Bye Bye! या ‘मॅजिक ऑईल्स’नी चेहरा होईल सॉफ्ट आणि ग्लोइंग

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

Krantijyoti Vidyalay: नवीन वर्षात भरणार मराठी शाळा; 'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम' नूतनवर्षी प्रेक्षकांच्या भेटीला

KBC 17: कृष्णाने अचानक अमिताभ बच्चन यांना विचारली त्यांची फी; बिग बी उत्तर देत म्हणाले...

SCROLL FOR NEXT