Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price : कापसाच्या दरात महिनाभरानंतर वाढ; भाव वाढूनही कापसाची आवक मंदावलेलीच

Amravati News : कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी गत वर्षी दरवाढीच्या आशेने कापूस घरात भरून ठेवला होता. मात्र भाववाढ न झाल्याने कमी दरात विक्री करावी लागली होती.

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : सहा हजार रुपयांवर गेलेले कापसाच्या दरात मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. त्यानुसार (Amaravati) अमरावतीमध्ये देखील महिनाभरानंतर (Cotton Price) कापसाच्या दरात वाढ झाली असून साडे सात हजार रुपयांच्या वर दर पोहचले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Maharashtra News)

कापूस (Cotton) उत्पादक शेतकऱ्यांनी गत वर्षी दरवाढीच्या आशेने कापूस घरात भरून ठेवला होता. मात्र भाववाढ न झाल्याने कमी दरात विक्री करावी लागली होती. यामुळे (Farmer) शेतकऱ्यांना आर्थिक झळ सहन करावी लागली होती. यंदा देखील कापसाची लागवड बऱ्यापैकी झाली होती. यंदा कापसाच्या उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांनी मोठी घट झाली. मात्र सुरवातीपासूनच कापसाचे दर अपेक्षित नव्हते. काही दिवस वाट पाहिल्यानंतर कापूस विक्रीला काढला होता. एक महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी कमी दरात कापूस विकला होता. यानंतर आता भाव वाढ झाली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तरीही आवक मंदावलेली 

राज्यात कापसाचे भाव वाढत असून साधारण दर साडेसात हजाराच्या वर गेले आहेत. यात अमरावतीमध्ये कापसाचे दर प्रतिक्विंटल ७ हजार ६५० रुपये झाले आहेत. असे असले तरी भाव वाढूनही बाजारपेठेत कापसाची आवक मंदावलेलीच आहे. शेतकऱ्यांना कापसाच्या दारात आणखी वाढ होण्याची अपेक्षा असल्याने कापूस विक्रीस काढत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT