Amravati News Saam tv
ऍग्रो वन

Amravati News : नाफेड सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी फिरवली पाठ; आर्द्रता व निकषावर शेतकऱ्यांची नाराजी

Amravati News : शासन दराने सोयाबीनची खरेदी करण्याकरिता नाफेड अंतर्गत अमरावती जिल्ह्यात २० केंद्र सुरू करण्यात आली.

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: सोयाबीनसाठी शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावानुसार नाफेडच्या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना दर मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्रांकडे पाठ फिरवली असून खासगी बाजारात जाऊन सोयाबीन विक्री करत आहेत. 

शासन दराने सोयाबीनची खरेदी करण्याकरिता नाफेड अंतर्गत (Amravati) अमरावती जिल्ह्यात २० केंद्र सुरू करण्यात आली. यासाठी दहा हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्या तुलनेत १८ केंद्रामध्ये फक्त ४२४ शेतकऱ्यांच्या १५ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली. (Soyabean Price) सोयाबीनमधील आद्रता व निकष या अटीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे सरकारच्या नाफेड केंद्रावर शेतकऱ्यांनी जाणे टाळले आहे. 

हमीभावापेक्षा मिळतोय कमी दर 

दरम्यान शासनाने यावर्षी ४ हजार ८९२ प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर केला. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला नाही. परिणामी खाजगी बाजारात शेतकऱ्यांना सोयाबीन साडेतीन हजार ते चार हजार रुपयात सोयाबीन विकावे लागत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT