Akola Agricultural Produce Market Committee जयेश गावंडे
ऍग्रो वन

अकोल्यात तूर सात हजारांवर; तुरीची विक्रमी दराकडे वाटचाल

बाजार समितीत तुरीला हमीभावापेक्षा 700 ते 800 रुपये अधिक भावाने विक्री होत असून, ही दरवाढ कायम राहिल्यास तुरीचे पीक हे गतवर्षीचा 9 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अॅड. जयेश गावंडे

अकोला - पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत (Akola Agricultural Produce Market Committee) तुरीच्या भावात तेजी पाहायला मिळत असून तुरीच्या दराने विक्रमी भावाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. अकोल्यात (Akola) तुरीला सात हजार रुपयांचा दर मिळाल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे यंदा सोयाबीन (Soybean) कपाशीसह तुरीचेही सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. बाजार समितीत तुरीला हमीभावापेक्षा 700 ते 800 रुपये अधिक भावाने विक्री होत असून, ही दरवाढ कायम राहिल्यास तुरीचे पीक हे गतवर्षीचा 9 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Akola Agricultural Produce Market Committee Latest News)

हे देखील पहा -

अकोला जिल्ह्यात सद्यस्थितीत बाजारात तुरीची आवक सुरू झाली असून, चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये (Farmer) आनंद दिसून येत आहे. गत दोन वर्षांपासून कोरोनाचे (Corona) संकट, नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशातच यंदा खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन,उडीद, मूग, संत्रा, भाजीपाला अशा पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. तर दुसरीकडे उत्पादनाला सरकारी हमीभावापेक्षा चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

अकोला बाजार समितीत तुरीला 6 हजार 900 रुपये दर मिळाला आहे. तर अकोटच्या बाजार समितीत तूर सात हजारांवर गेली आहे. यावर्षी तुरीला 6 हजार 300 हमीभाव असून हमीभाव पेक्षा जास्त 600 ते 700 रुपये दर बाजर समितीत मिळत आहे. भविष्यात आणखी भाववाढीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT