Akola : अकोट तालुक्यातील शेतकरी महिलेने विष प्राशन करून संपवली जीवनयात्रा! जयेश गावंडे
ऍग्रो वन

Akola : अकोट तालुक्यातील शेतकरी महिलेने विष प्राशन करून संपवली जीवनयात्रा!

शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच! प्रकल्पाच्या पाण्यामुळे शेतीचे नुकसान झाल्याने महिला शेतकऱ्याची आत्महत्या.

जयेश गावंडे

अकोला : वडाळी देशमुख येथील गट क्रं. 488 मध्ये शहापूर प्रकल्पाचे पाणी येत असल्याने गेल्या दोन वर्षांपासून येथील शेती खराब झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. परिणामी येथील शेतकऱ्यांनी याबाबत मागील वर्षी व याही वर्षी जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाला निवेदन दिले होते. प्रकल्पातून येणारे पाणी थांबवावे आणि आमच्या शेतीचे नुकसान थांबवावे, अशी मागणी त्यांनी केली होती. तसेच आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता.

हे देखील पहा :

मात्र, जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. शेवटी वडाळी देशमुख या गावातील रेखा उत्तमराव वाघ या शेतकरी महिलेने विषारी औषध प्रशान करून आत्महत्या केली. जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाने कारवाई न केल्याने माझ्या आईने आत्महत्या केली असल्याचा आरोप रेखा वाघ यांचा मुलगा गणेश वाघ यांनी केली आहे.

जोपर्यंत यावर पाटबंधारे विभाग शहापूर प्रकल्पातील पाणी थांबविण्यासाठी कारवाई करणार, असे लिहून देत नाही, निवेदन दिल्यावर ही पाटबंधारे विभाग सबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करीत नाही, तोपर्यंत आईचा मृतदेह खासगी रुग्णालयातुन उचलणार नाही, अशी भूमिका मृतकांच्या नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cardio Workout at Home: घरच्या घरी करा कार्डिओ वर्कआउट; फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी या ७ एक्सरसाइज बेस्ट

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गवरील कासार्डे ब्रिजच्या स्लॅबचा भाग कोसळला

Goregaon Mulund Link Road: दिंडोशी कोर्ट ते फिल्मसिटी आता सुसाट जा, फ्लायओव्हर या दिवशी होणार सुरू; गोरेगाव मुलुंड लिंकरोडवर मोठी अपडेट

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी मेहनत करूनही फरक दिसत नाही? नकळत होणाऱ्या 'या' चुका पडू शकतात महागात

Pune : गे डेटिंग ॲपवर तरुणाला ओळख करणं पडलं महागात; भेटायला बोलावलं अन् भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT