Akola farmers Sowing saam tv
ऍग्रो वन

अकोला जिल्ह्यात पेरणीला सुरुवात, बळीराजा नांगरणीसाठी शेतात उतरला

अकोल्यातील काही भागात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे.

जयेश गावंडे

अकोला : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला वरुणराजा (Monsoon) पुन्हा लवकरच बरसेल, असा अंदाज महाराष्ट्रातील बळीराजाने शेताच्या बांधावर बांधला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आणि अकोल्यातील शेतकऱ्यांचे आनंदाश्रू तरळले. असंच आनंदाच वर्षाव अकोल्यातील शेकऱ्यांवर (Akola Farmers) झाला आहे. अकोल्यातील काही भागात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. तेल्हारा तालुक्यातील दानापूर शेतशिवारात सध्या पेरणीची (Farm Sowing) लगबग पाहायला मिळत आहे. या भागात मान्सून पूर्व पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे.

पावसाळा सुरू झाला की, शेतकऱ्यांची लगबग सुरु होते ती खरिपातील पेरणीची.काही भागात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे.अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील दानापूर शेतशिवारात सध्या पेरणीची लगबग पाहायला मिळत आहे.अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पध्दतीने कपाशीच्या पेरणीला सुरुवात केलीय.या भागात मान्सूनपूर्व पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली.दरम्यान, जून महिना अर्धा संपला तरी सार्वत्रिक पाऊस न पडल्याने यावर्षी पेरण्या लांबणीवर जाण्याची शक्यता होती.

मात्र, ज्या भागात चांगला पाऊस झाला, त्या भागात पेरणी करण्यात येत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दरम्यान पेरणीयोग्य पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी सुरु करु नये, शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात करताना जमिनीतील ओलावा किती आहे, हे पाहावं,नंतरच सुरवात करावी,वाणाची निवड करुन प्रत्यक्ष पेरणी करताना बियाणे दोन ते तीन सेंमीपेक्षा जास्त खाली जाणार नाही. याची काळजी घ्यावी. किमान 70 ते 80 मिलीच्यावर पाऊस किंवा जमिनीत 3 ते 4 इंच ओलावा असल्यास पेरणीला सुरवात करावी,असा सल्ला कृषी विद्यापीठाने दिला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धावती लोकल पकडताना 70 वर्षीय व्यक्तीचा तोल गेला, तितक्याच...; डोंबिवली स्टेशनवरील जीवघेणा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Maharashtra News Live Update: बंडखोर खासदारांनी केलेले आरोप खोटे : आमदार संजय देरकर

पोट सुटलंय? जाडे दिसताय? मग आजपासूनच घरच्या घरी सुरू करा 'हे' 5 योगा

मी धर्म संकटात, पाऊल चुकीचे वाटतंय, पण...; ओमराजे निंबाळकरांनी स्पष्टच सांगितलं

Operation Tiger : ठाकरेंचे 'ते' २ खासदार फुटायला तयारच नव्हते; दिग्गज नेत्यानं खेळला मास्टरस्ट्रोक अन् स्क्रिप्ट बदलली

SCROLL FOR NEXT