Ahmednagar News
Ahmednagar News Saam Tv
ऍग्रो वन

Ahmednagar News : कुरकुटवाडीचे शेतकरी बंधू झेंडूच्या शेतीतून मालामाल!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन बनसोडे

Ahmednagar Farmer News : संगमनेर तालुक्याच्या कुरकुटवाडी येथील ज्ञानेश्वर सहाणेआणि निवृत्ती सहाणे या शेतकरी बंधूंनी आपल्या तीन एकर शेतीत 'अप्सरा यल्लो' या झेंडूच्या फुलांची लागवड केली आहे. आता ही शेती फुलली असून, जणूकाही पिवळ्या सोन्याची खाणच दिसत आहे. सध्या फुलांना प्रतिकिलो ७५ ते ८० रुपयांचा भाव मिळत असून सहाणे बंधूंच्या जीवनात आर्थिक समृद्धी आली.

ज्ञानेश्वर आणि निवृत्ती सहाणे हे सख्खे बंधू शेतीत नेहमीच नाविन्यपूर्ण प्रयोग करत आले आहेत. त्यांना अवघी चार एकर शेती असून त्यांनी तीन एकर क्षेत्रावर मल्चिंग पेपरवर अप्सरा यल्लो झेंडूची (Marigold) लागवड केली आहे. तंत्रज्ञान आणि मेहनतीच्या बळावर चांगले उत्पादन निघत असून सरासरी ८० रुपये प्रतिकिलो प्रमाणे काही महिन्यातच लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

सहाणे बंधूंच्या या मेहनतीला कुटुंबियांची देखील भक्कम साथ मिळाली आहे. नोकरदार वर्ग ज्याप्रमाणे आठ तास काम करतो, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी कमीत कमी आठ तास शेतीत काबाडकष्ट केले तर शेतकरी (Farmer) नक्कीच यशस्वी होऊ शकतो अशा भावना सहाणे बंधूंच्या आहेत. बाजारपेठ, वातावरण आणि शेतीत नवीन प्रयोग करण्याचे तंत्र आत्मसात केले तर इतरही शेतकरी सहाणे बंधुंप्रमाणे आर्थिक सुबत्ता साधू शकतात एव्हढं मात्र नक्की.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकची कंटेनरला धडक; १ ठार २ जखमी, वाशिममधील घटना

Abhijit Patil Supports BJP: महाविकास आघाडीला मोठा धक्का! सोलापुरात बड्या नेत्याचा भाजपला पाठिंबा

Todays Horoscope: 'या' राशीच्या लोकांचं नशीब उजळलं; लवकरच गोड बातमी मिळणार, वाचा आजचे पंचांग

Maharashtra Politics: मी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं नाही; श्रीकांत शिंदेंनी आदित्य ठाकरेंना डिवचलं

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT