सांगलीत दुचाकी इंजिनचा वापर करुन, पठ्ठ्यानं शेती मशागतीसाठी बनवली चारचाकी गाडी विजय पाटील
ऍग्रो वन

सांगलीत दुचाकी इंजिनचा वापर करुन, पठ्ठ्यानं शेती मशागतीसाठी बनवली चारचाकी गाडी

पाटील यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. गेली 20 वर्षे ते या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना छोटी-छोटी सायकल कोळपी व इतर लोखंडी अवजारे बनवून देत आहेत. हे करत असतानाच शेतकऱ्यांना उपयुक्त असे नवीन काही करता येईल का ? याचा विचार त्यांनी केला.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगलीच्या इस्लामपूर येथील कुमार पाटील या तरुणाने फॅब्रिकेशन व्यवसायातील अनुभव आणि कौशल्ये वापरत चारचाकी गाडीची निर्मिती केली आहे. तर दुचाकीच्या इंजिनचा वापर केलेली चार चाकीगाडी शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे. शेतीमध्ये अंतर्गत मशागतीची कामे या गाडीने सहज करता येत आहेत. एक वर्षाच्या मेहनतीने तयार करण्यात आलेल्या गाडीची अंतिम चाचणी यशस्वी झाल्याने कुमार पाटील (Kumar Patil) हे समाधानी झाले आहेत.

इस्लामपूर-पेठ (Islampur) रस्त्यावर विष्णूनगर येथे पाटील यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. गेली २० वर्षे ते व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना छोटी-छोटी सायकल कोळपी व इतर लोखंडी अवजारे बनवून देत आहेत. हे करत असतानाच शेतकऱ्यांना उपयुक्त असे नवीन काही करता येईल का ? याचा विचार त्यांनी केला. आणि एक वर्षापूर्वी त्यांना चार चाकी गाडीची कल्पना सुचली लोखंडी साहित्य वापरताना दुचाकीचे इंजिन (Two-wheeler engine) वापरण्याचे ठरले 100CC इंजिन घेत त्यापासून चारचाकीची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला.

घरामध्ये सर्वांचा विरोध असताना दोन वेळा तयार झालेल्या चारचाकी गाडीचा सांगाडा मोडीत काढला. नवनिर्मितीचा ध्यास घेत पुन्हा ही गाडी तयार केली. गाडी तयार करीत असताना स्टेरिंग ऐवजी हॅण्डलचा वापर केला, गिअर टाकून गाडी पाठीमागे सहज कशी घेता येईल का ? यासाठी प्रयत्न केले आणि त्याला यशही आले आहे. इंजिन दुचाकीचे असले तरी रिव्हर्स गियरचा बॉक्स स्वतःच्या कल्पकतेने तयार केला आहे.

हे देखील पहा -

दरम्यान या गाडीला शेती अवजारे कशी जोडता येतील? यासाठी मित्रांशी चर्चा करून तशी अवजारे ही बनवलेली आहेत. कोळपणी, नांगरट, पेरणी तसेच औषध फवारणी या शेती कामासाठी ही गाडी उपयुक्त ठरणार आहे. कमीत कमी जागेत सहजपणे गाडी नेता येते. सहज हाताळताना गाडीचा वापर शेतीला कसा करता येईल? असा विचार केला गेला आहे. पशुखाद्याची पोती वाहतूक तसेच वैरणीची ने आण करणे यासाठी सीटच्या मागे दोन्ही चाकांच्या गार्डवर तशी रचना केली आहे.

पाटील यांनी विष्णूनगर मध्ये एका शेतकऱ्याच्या शेतीमध्ये गाडीची चाचणी घेतली. १ लिटर पेट्रोलमध्‍ये १ एकर क्षेत्रातील कोळपणीचे काम ही चारचाकीगाडी करत आहे. अल्प वेळेत व कमी खर्चात चारचाकी गाडी काम करत असल्याने शेतकऱ्यांना ती वरदान ठरणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

SCROLL FOR NEXT