Increase in the price of vegetables, Navi Mumbai Latest Marathi News Saam Tv
ऍग्रो वन

Pitru Paksha 2023 : एपीएमसीत भाज्यांचे दर कडाडले! वाटाणा 150 रुपयांवर, मेथीने गाठली पन्नाशी

Check Increased Price of Vegetables: पितृपक्ष सुरु असल्याने भाज्यांच्या मागणीत माेठी वाढ झाली आहे.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

Vegetable Price Hike

नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांचे दर तब्बल 40 टक्क्यांनी वाढले आहेत. परतीच्या पावसाने शेतात साचलेल्या पाण्यात भाजीपाला खराब झाल्याने आठवडाभरातच आवक घटली. त्यामुळे भाज्यांचे दर कडाडलेले आहेत (Maharashtra News)

याबराेबरच पितृपक्ष सुरु असल्याने भाज्यांच्या मागणीत माेठी वाढ झाली आहे. त्यामुळे एपीएमसी मार्केट येथे भाजीपाल्याचे दर 40 टक्क्यांनी वाढले आहे. व्यापा-यांनी दिलेल्या माहितीनूसार वाटाणा 150 रुपयांवर पोहोचला आहे. मेथीच्या भाजीने पन्नाशी गाठली आहे अशी माहिती व्यापारी कैलास ताजणे यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

एपीएमसीतील आजचे भाज्यांचे दर

वाटाणा - 150 ते 160 रुपये (प्रति किलो)

टोमॅटो - 9 रुपये

फ्लॉवर - 25 रुपये

कारली- 25 रुपये

कोबी - 12 रुपये

दुधी - 28 रुपये

वांगी - 24 रुपये

काकडी - 26 रुपये

भेंडी - 40 रुपये

फरसबी - 40 रुपये

गाजर - 20 रुपये

ढोबळी मिरची - 30 रुपये

तोंडली - 44 रुपये

घेवडा - 40 रुपये

शेवगा - 40 रुपये

पालेभाजी प्रति जुडी दर

मेथी - 50 रुपये

शेपू - 25 रुपये

कोथिंबीर - 25 रुपये

पालक - 20 रुपये

कांदापात - 15 रुपये

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Fort : कुछ तुफानी करते है! 'हा' किल्ला चढताना काळजाचा ठोका चुकतो, २,२५० फूट उंचीवरचा थरारक ट्रेक

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी खुशखबर, कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

Swine flu symptoms: देशभरात वाढतोय स्वाईन फ्लूचा धोका; ही 4 लक्षणं दिसली तर लगेच व्हा सावध

September Picnic Spots : सप्टेंबरमध्ये फिरण्यासाठी 'ही' ५ ठिकाणं ठरतील बेस्ट, आजच प्लान करा ट्रिप

SCROLL FOR NEXT