34 dhan kharidi centers in bhandara  saam tv
ऍग्रो वन

Bhandara : 'साम टीव्ही' च्या बातमीनंतर प्रशासनाची कार्यवाही, भंडा-यात 34 आधारभूत केंद्रावर धान खरेदीस प्रारंभ

Saam Impact : धान खरेदी केंद्रांवर अनियमितता आढळून आल्यास कारवाई केली जाणार असल्याची माहिती भंडारा जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Bhandara News :

धान खरेदी केंद्र सुरू न केल्याने शेतकऱ्यांना दिवाळी सणात व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने धान विक्री करावी लागल्याचे वास्तव साम टीव्हीने समाेर आणल्यानंतर भंडारा जिल्ह्यात 34 धान केंद्र सुरु करण्यात आली. यामुळे शेतक-यांतून समाधन व्यक्त केले जात आहे.(Maharashtra News)

शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्यावतीने ९ नोव्हेंबर रोजी परीपत्रक पणन हंगाम २०२३ अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी करण्याचे काढले आहे. साधारण जातीच्या धानास २१८३ तर अ दर्जाच्या धानास २२०३ रूपये प्रतिक्विंटल भाव निश्चित करण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केंद्र शासनाने 'धान' खरेदीकरीता राज्यात 'विकेंद्रीत खरेदी योजना' लागू करण्याबाबत केलेली शिफारस विचारात घेऊन पणन हंगाम २०१६-१७ पासून विकेंद्रित खरेदी योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी हाेत नव्हती.

साम टीव्हीमुळे झालं शक्य

प्रशासनाच्या चुकीमुळे धान खरेदी रखडल्याचा गंभीर आराेप आमदार नरेंद्र भाेंडेकर यांनी देखील केला हाेता. साम टीव्हीने भंडारा जिल्हयातील स्थिती मांडल्यानंतर पणन विभागाने जिल्ह्यातील 131 आधारभूत धान खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणीला सुरुवात केली. शेतकऱ्यांचे सात बारा ऑनलाईन करण्यात आले आहे. आता 34 आधारभूत धान खरेदी केंद्रावर 31 हजार 500 क्विंटल धान खरेदीही झाली.

जिल्ह्यातील उर्वरित धान खरेदी केंद्र येत्या दोन दिवसांत सुरू होणार असल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे. दुसरीकडे धान खरेदी केंद्रांवर अनियमितता आढळून आल्यास अशा केंद्रांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती भंडारा जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fanasachi Poli Recipe : कोकण स्पेशल फणसाची मऊसूत गोड पोळी; तोंडात टाकताच विरघळेल, वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: नाशिक पोलिसांनी गॅस चोरी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांविरोधात ५५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, कोण कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार? यादी आली समोर

ऑफिसमध्ये दारू पिता येणार? दारू पिणाऱ्यांसाठी नवे नियम?

Malaika Arora Weight Loss Secret: मलायका अरोरासारखी फिगर हवी आहे? मग सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' हेल्दी ड्रिंक

SCROLL FOR NEXT