Buldhana News
Buldhana News Saam Tv
ऍग्रो वन

विषबाधेमुळे 12 गाईंचा मृत्यू? मेहकर तालुक्यातील घटना

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा - मेहेकर तालुक्यातील मांडवा समेट डोंगर या गावातील 12 गाई चरत असताना अचानक मृत्युमुखी पडल्या आहेत. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना तातडीने माहिती देण्यात आली. त्यानंतर पशु वैद्यकीय अधिकारी व टीम यांनी घटनास्थळी जाऊन गाईंची तपासणी केली असता या सर्व गाई विषबाधे मुळे मृत्युमुखी पडल्या असाव्यात असा प्राथमिक अंदाज पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

हे देखील पाहा -

या सर्व गाईचे शवविच्छेदन करण्यात येणार असून अहवाल आल्या नंतर गाईंचा मृत्यू कश्याने झाला हे स्पष्ठ होईल असे पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्रामीण भागात एवढ्या संख्येने गाईंचा मृत्यू होणे हे संशयास्पद असल्याचे ग्रामस्थानचे म्हणणे आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना कोणी घडविली की घडली याचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election |अबब! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात 9 हजार कोटींचा मुद्देमाल जप्त!

Sambhajinagar News: प्रेमविवाह करणाऱ्या मुलीची ‎कोयत्याने हत्या; शीर हातात घेऊन सेल्फी, मायलेकांना जन्मठेप

Special Report : नवी मुंबईत बनावट नोटांचा छापखाना

Pune News | पुण्यातील चाकण परिसरात गॅस टँकरचा स्फोट

Gold Silver Rate Hike : सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ; वाचा महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील आजचा भाव

SCROLL FOR NEXT