viral satya corona virus alcohole option medicine WHO clurification 
आज पाहा

Viral | दारू प्यायल्याने कोरोना व्हायरसपासून बचाव होतो ?

संदीप चव्हाण

कोरोना व्हायरसनं चीनमध्येच नव्हे तर जगभरात थैमान घातलाय.महाराष्ट्रात दिवसेंदिवस पेशंटची संख्या वाढत चाललीय.पण, कोरोना व्हायरस झालेल्या पेशंटवर काय उपचार करावा हे सोशल मीडियावरून सांगितलं जातंय.लोक वाट्टेल ते बोलू लागलेयत.डेटॉलमुळे कोरोना बरा होतो असाही दावा केला होता.पण, आता हद्दच पार केली.दारू प्यायल्याने कोरोना बरा होतो असा दावा करण्यात आलाय.हा मेसेज व्हायरल होत असल्याने अनेकांना खरं वाटू लागलंय.त्यामुळं याची सत्यता जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.पण, मेसेजमध्ये काय दावा केलाय वाचा सविस्तर.

काय आहे व्हायरल मेसेज ?
दारू प्यायल्याने कोरोना व्हायरसचा धोका नाही.अल्कोहोलची कोरोना व्हायरसला एलर्जी आहे

हा मेसेज व्हायरल होत असल्याने याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली.याबद्दल अधिक माहिती एक्सपर्ट देऊ शकतात.आमचे प्रतिनिधी संजय डाफ एक्सपर्टला भेटले.त्यांना मेसेज दाखवला आणि दारुमुळे कोरोनाचा धोका नाही का हे जाणून घेतलं.

दारू पिणं हे आरोग्यासाठी चांगलं नाही.कोरोनावर अजून औषध उपलब्ध नसल्याने असे मेसेज वाचून विश्वास ठेवू नका- डॉ. अविनाश बानाईत, आरोग्य अधिकारी

त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं वाचा सविस्तर.

  • काय आहे व्हायरल सत्य ?
  • दारूचा आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही
  • दारू पिल्याने कोरोना व्हायरस नष्ट होतो, ही अफवा
  • नागरीकांनी अफवेवर विश्वास ठेवू नये
  • कोरोनावर अजूनही प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक औषधे उपलब्ध नाही
  • उलट दारू प्यायल्यावर शरीरातील पांढऱ्या पेशी या नीट काम करत नाही
  • रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, दारू पिणे हे हानिकारक आहे

WHO ने यावर खुलासा करत दारूमुळे कोरोना व्हायरस मरत नसल्याचं स्पष्ट केलं.त्यामुळं असे मेसेज व्हायरल करून चुकीची माहिती देणं योग्य नाही.व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका.आमच्या पडताळणीत दारू प्यायल्याने कोरोना व्हायरसचा धोका नाही हा दावा असत्य ठरला.

web title : viral satya corona virus alcohole option medicine WHO clurification

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह, अस्मानी संकटातही बळजबरी वसुली?

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

अमेरिकेचा विक्रम मोडला! नाशिकमध्ये 501 शंखांचा निनाद; थेट गिनीज बुकमध्ये नोंद|VIDEO

Sleep Health : रात्री झोपेत मुलगा वारंवार बेड ओला करतो? पालकांनो, रागवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या 'ही' ५ मोठी कारणे

Monday Horoscope : या 7 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात होणार मोठा बदल; वाचा सोमवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT