आज पाहा

दु:खद बातमी| गेल्या 24 तासात कोरोनाने केला कहर

साम टीव्ही न्यूज

देशातील एकूण रुग्णसंख्या सात लाखांवर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत २४ हजार २४८ रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्या ६ लाख ९७ हजार ४१३ झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी म्हटले होते. मात्र, सायंकाळपर्यंत विविध राज्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे देशातील रुग्णसंख्येने सात लाखांचा टप्पा पार केल्याचे स्पष्ट झाले.

दिल्लीमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. पण, करोनाबाधित रुग्णांचे सरासरी प्रमाण कमी होऊ लागले असल्याचा दावा करण्यात आला आहे. दिल्लीत प्रतिदिन १८ हजार चाचण्या घेतल्या जात आहेत.देशात पाच दिवसांमध्ये १ लाख रुग्ण वाढले असून सलग तीन दिवस प्रतिदिन २० हजारांहून अधिक रुग्णवाढ झाली आहे. करोनासाठी झालेल्या चाचण्यांमध्ये करोनाबाधित नमुन्यांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण ६.७३ टक्के आहे.

भारतातील दिवसातील मृत रुग्णांची संख्या करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेपेक्षाही जास्त आहे. २९ लाख करोनाबाधित रुग्ण असणाऱ्या अमेरिकेत गेल्या २४ तासात २७१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. फक्त ब्राझिलमध्ये भारतापेक्षा जास्त मृत्यूची नोंद झाली आहे. ब्राझिलमध्ये ६०२ जणांचा मृत्यू झाला आहे.भारतात गेल्या २४ तासात ४२५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

आतापर्यंत भारतात १९ हजार ६९३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आङे. दुसरीकडे अमेरिकेत १ लाख २९ हजार ९४७ मृत्यूंची नोंद झाली असून ब्राझिलमध्ये ही संख्या ६४ हजार ८६७ आहे. एका आठवड्यापूर्वी ३ टक्के आणि दोन आठवड्यांपूर्वी ३.२ टक्के असणारा भारतातील मृत्यूदर २.८ वर पोहोचला आहे. अमेरिका आणि ब्राझिलशी तुलना करता तेथील मृत्यूदर अनुक्रमे ४.५ आणि ४.१ टक्के आहे. जागतिक मृत्यूदर ४.७ टक्के आहे. करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत पहिल्या तीन क्रमांकावर अमेरिका, ब्राझिल आणि भारत आहे.


 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nominee Rules : मृत व्यक्तीच्या बँक खात्यातील पैसे घरात कोणाला मिळतात? जाणून घ्या ८ महत्त्वाचे नियम

Heart Health : सकाळी दिसणारी हार्ट अटॅकची 6 महत्त्वाची पूर्वलक्षणे कधीही दुर्लक्ष करू नका

Maharashtra News Live Update: नागपुरात राहुल गांधीना सद्बुद्धी मिळावी यासाठी भाजप युवा मोर्चाकडून अनोखे आंदोलन

Tushar Gandhi : महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

अभिजित दीपकेंच्या आजींचं निधन, नातू दिल्लीत आंदोलनात असतानाच घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT