आज पाहा

वाचा | योग दिन हा एकात्मतेचा दिवस -पंतप्रधान नरेंद्र मोदी

साम टीव्ही न्यूज

नवी दिल्ली :करोनाच्या या संकटाच्या काळात जगभरातील लोकांनी माय लाईफ माय योग या स्पर्धेत सहभाग हे दाखवून देतो की, लोकांच्या योगाविषयी उत्साह वाढत आहे. यावर्षी योगाचं ब्रीद घरातच योग, कुटुंबासोबत योग आहे. आज सगळे कुटुंबासोबत योग करत आहे. योगाच्या माध्यमातून सगळे एकत्र येतात, तेव्हा संपूर्ण घरात ऊर्जेचा संचार होता. कौटुंबिक बंध वाढवण्याचाही हा दिवस आहे. करोनाच्या संकटामुळे जग योगाला पूर्वीपेक्षा अधिक गांभीर्यानं घेत आहे. प्रतिकारशक्ती चांगली असेल तर करोनाला हरवण्यात मदत मिळते. योगाची अनेक आसनं आहेत. जी आपल्या शरीराची शक्ती वाढवतात,” असं मोदी म्हणाले.२०१५ मध्ये २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषणा करण्यात आली. त्यानंतर आज सहावा योग दिवस साजरा होत आहे. यानिमित्तानं बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “योग दिन हा एकात्मतेचा दिवस आहे. जो आपाल्याला जोडतो. सोबत आणतो तोच तर योग आहे.

“निष्काम कर्मयोगाची भावना भारताच्या नसानसात आहे. जेव्हा जेव्हा गरज पडली, तेव्हा जगाने याचा अनुभव घेतला आहे. स्वतःच्या, आपल्या स्वकीयांच्या आरोग्यासाठी सजगपणे एकजुटीनं पुढे जाऊ. आपण प्रयत्न करू की, घरात योगा व कुटुंबीयांसोबत योगा हे दररोज करू. हे केलं तर आपण जरूर यशस्वी होऊ,” असं मोदी म्हणाले.

“करोना विषाणू आपल्या श्वसन संस्थेवर हल्ला करतो. श्वसन संस्था अधिक सक्षम करण्यासाठी योगाची मोठी मदत होते. यासाठी अनुलोम विनुलोम प्राणायम आहे. प्राणायमाचे असंख्य प्रकार आहेत. योगाची ही आसनं श्वसन संस्था मजबूत करण्यासाठी मदत करते. त्यामुळे प्रत्येकानं प्राणायमाचा दैनंदिन आयुष्याचा भाग बनवावं. करोना झालेल्या लोकांनाही यातून बाहेर पडण्यासाठी ताकद मिळत आहे. योगामुळे मानसिक शांती मिळते. संयम व सहनशक्तीही मिळते,” असं मोदी म्हणाले.

“कितीही वाईट परिस्थिती असली तरीही क्रियाशील राहणे. हार न माननं हे योगामुळे आपल्या आयुष्यात ऊर्जा मिळते. योग करणारी व्यक्ती कधीही घाबरत नाही. कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहणे हेच तर योगा आहे. योगा सर्व भेदभावांच्या वर आहे. तो कुणीही करू शकतो. योगाच्या माध्यमातून समस्याच्या निराकरणाची गोष्ट करत आहोत. योगामुळे जीवनात अधिक योग्य बननण्याची क्षमता प्राप्त होते,” असं मोदी म्हणाले.जगावर करोनाचं संकट ओढवलेलं असताना जगभरात सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. मोदी म्हणाले,”करोनासारख्या महामारीच्या संकटात जग योगाला अधिक गांभीर्यानं घेत आहे. योगामुळे आपलं मानसिक व शारीरिक आरोग्य अधिक सुदृढ बनतं. त्यामुळे प्रत्येकानं व्यायाम करण्याबरोबरच योगालाही आयुष्याचं भाग बनवावं,” असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं.

WebTittle: Read | Yoga Day is a day of unity - Prime Minister Narendra Modi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Astrology: आजपासून 'या' राशींचे दिवस चमकणार, शनीची साडीसती संपणार

Supreme Court: चुकीच्या वक्तव्याची तुलना द्वेषपूर्ण भाषणाशी होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले

Numerology: या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती असतात लकी; प्रेमात अन् करिअरमध्ये मिळते यश

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

SCROLL FOR NEXT