आज पाहा

वाचा | 'रिलायन्स'वरील कर्जाबाबत अंबानीं काय म्हणतायत...

साम टीव्ही न्यूज


मुंबई :करोनाने जगाला हादरुन सोडले असले तरी रिलायन्सच्या जिओ प्लॅटफाॅर्ममध्ये मागील दोन महिने गुंतवणुकीचा धडाका सुरू होता. नुकताच 'पीआयएफ' या कंपनीने जिओमध्ये ११,३६७ कोटींची गुंतवणूक केली. दोन महिन्यांच्या काळात जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणारी 'पीआयएफ' ११ वी कंपनी ठरली आहे. 'पीआयएफ'ने २.३२ टक्के हिस्सेदारी विकत घेण्याची घोषणा केली. ११ गुंतवणूकदारांना जिओमधील २४.७० टक्के हिस्सेदारी विक्री करण्यात आली आहे.

एका अहवालानुसार रिलायन्स समूहावर २.५७ लाख कोटी इतके कर्ज आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने जिओतील हिस्सा विक्रीने १.१५ लाख कोटी मिळवले आहे. त्याशिवाय राईट इश्युतून ५३,१२४ कोटी कंपनीला उपलब्ध झाले. रिलायन्सने यापूर्वीच बीपी कंपनीला इंधन व्यवसायातील हिस्सा विक्री करून १.७५ लाख कोटी मिळवले आहे. त्यामुळे ३१ मार्च २०२१ च्या डेडलाइन पूर्वी तब्बल ९ महिने आधीच रिलायन्स समूह कर्जमुक्त झाला आहे.

जिओ इन्फोकॉम ही देशातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी आहे. कंपनीचे ३८ कोटींहून अधिक ग्राहक आहेत. जिओ प्लॅटफॉर्मला जागतिक दर्जाची कंपनी करण्याचे अंबानी यांचे नियोजन आहे. त्यादृष्टीने येत्या दोन वर्षात जिओ प्लॅटफॉर्मचा आयपीओ बाजारात येण्याची शक्यता आहे. दरम्यान नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीजने राईट इश्यूच्या माध्यमातून ५३,१२४ हजार कोटींचा निधी उभारला होता. कर्जमुक्तीच्या दिशेने रिलायन्स समूह आक्रमक वाटचाल करत असल्याचे दिसून आले होते.

रिलायन्स या सुवर्ण काळात एक नवा अध्याय रचेल अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. १२ ऑगस्ट २०१९ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी १८ महिन्यात रिलायन्सला कर्जमुक्त करण्याचे उद्धीष्ट जाहीर केले होते.रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले की, “रिलायन्स समूहाला कर्जमुक्त देण्याचे मी दिलेले वचन नियोजित वेळेआधीच पूर्ण केले आहे. रिलायन्सची बॅलन्स शीट ही जगातील सर्वात मजबूत बॅलन्स शीट असेल, असा मला विश्वास आहे. 

WebTittle :: Read | What does Ambani say about Reliance loan ...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi: अभिजीत पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट, देश आणि राज्यातील विविध मुद्द्यांवर झाली चर्चा

India T20 World Cup Squad : किंग कोहलीवर विश्वास कायम, पंत आणि चहलचंही कमबॅक; टी-20 वर्ल्डकप टीमबाबत ५ महत्वाचे मुद्दे

PM Narendra Modi आणि एपी ग्लोबालेचे संस्थापक अभिजीत पवार यांची नवी दिल्लीत भेट

Explainer : लोकल गर्दीमुळे आणखी किती रियांचे बळी जाणार? डोंबिवली - कोपरदरम्यानच घटना का घडताहेत?

MI Vs LSG : लखनौच्या गोलंदाजांसमोर मुंबईचा संघ गडगडला; लखनौसमोर १४५ धावांचं लक्ष्य

SCROLL FOR NEXT