आज पाहा

GOOD NEWS | भारत बायोटेकने बनवली कोरोनावरची लस

साम टीव्ही न्यूज

कोरोनावरची लस भारतात तयार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. भारत बायोटेकने ही लस बनवली आहे. यातील आनंदाची बाब म्हणजे या लसीच्या मानवी चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. भारत बायोटेकला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने चाचणीची परवानगी दिली आहे. भारत बायोटेक ही हैदराबादमधील फार्मा कंपनी आहे. या कंपनीने करोनावर लस बनवल्याचा दावा केला आहे. मानवी चाचणीचे काम जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात येणारे. देशात तयार केलेली ही पहिली लस आहे. ही लस बनवण्यात आयसीएमआर आणि एनआयव्हीने मोठी भूमिका बजावली आहे. 

“कोविड -१९ वरील देशात विकसित केलेली ही देशातील पहिली लस असून आम्हाला त्याचा अभिमान आहे. या लसीच्या विकासात आयसीएमआर आणि एनआयव्हीचा सहभाग हा महत्त्वपूर्ण होता. सीडीएससीओच्या सक्रिय सहकार्याने आणि मार्गदर्शनाने याला मंजुरी देण्यात आली. आमच्या संशोधन टीमनं आणि उत्पादन टीमने आमच्या स्वतःच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यासाठी अथक परिश्रम घेतले.” असं मत भारत बायोटेकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एला यांनी व्यक्त केलं.

“सर्व प्रोटोकॉल्स पूर्ण करून कंपनीने वैद्यकीय चाचणी पूर्वीचा अभ्यास पूर्ण करण्याच्या उद्देशाने या संशोधनाला गती देण्यात आली. तसंच या अभ्यासाचे परिणाम प्रभावी आहेत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

जुलै महिन्यापासून या लसीची मानवी चाचणी सुरू केली जाणार असल्याची माहिती भारच बायोटेककडून देण्यात आली. “एसएआरएस-सीओव्ही -२ स्ट्रेनला पुण्यातील एनआयव्हीमध्ये वेगळो करण्यात आले आणि नंतर भारत बायोटेककडे वर्ग करण्यात आले. हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 (बायो-सेफ्टी लेव्हल 3) हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही लस विकसित करण्यात आली,” असं कंपनीनं निवेदनात म्हटलं आहे.

भारत बायोटेकनं करोनावरील लस COVAXIN तयार केल्याची सोमवारी घोषणा केली. आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून त्यांनी यशस्वीरित्या भारतातील पहिली करोना लस तयार केली आहे.भारतातील ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं फेज १ आणि फेज २ मानवी वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या अगोदर कंपनीने प्रीक्लिनिकल अभ्यासामधून मिळविलेले निकाल सादर केले होते. मानवी वैद्यकीय चाचण्या पुढील महिन्यात देशभरात सुरू होणार आहेत.देशात तसंच जगभरात करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत करोनावरील लस विकसित करण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत. करोनावरील लस विकसित करणाऱ्या देशांमध्ये भारतदेखील आघाडीवर आहे. परंतु अशातच सोमवारी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indi News: मोठी दुर्घटना! यात्रेत रथ अंगावरुन गेल्याने तिघांचा मृत्यू; कर्नाटकच्या इंडी तालुक्यातील घटना

Navi Mumbai crime : उरणमधील महिलेच्या हत्येचा उलगडा; पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर

Grah Gochar: १ मे पासून 'या' राशींचं पलटणार नशीब; मेषमधील सूर्य-शुक्राच्या युतीमुळे मिटतील अडचणी

Buldhana News: डीजेच्या दणदणाटामुळे मधमाशा चवताळल्या; वऱ्हाडी मंडळींवर चढवला हल्ला, लोक पळतच सुटले

Vegetables Rate Increased In APMC: उष्णता वाढल्यामुळे आवक घटली; भाजीपाला महागला, काय आहेत आजचे दर?

SCROLL FOR NEXT