सुंदर व गोरं दिसण्यासाठी तुम्ही फेअरनेस क्रीम वापरत असाल तर सावध व्हा...फेअरनेस क्रीम तुमच्या जीवाला धोका निर्माण करत असल्याचा दावा करण्यात आलाय...बाजारात नवनवीन प्रकारच्या फेअरनेस क्रीम विकल्या जातायत...त्यात स्टेरॉइड आणि पाऱ्याचं प्रमाण जास्त असल्यानं त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतोय...यामुळंच फुफ्फुसाला आणि किडनीला धोका निर्माण होऊ शकतो...पण, हे खरं आहे का...? अनेकजण गोरं दिसण्यासाठी फेअरनेस क्रीमचा वापर करतात...त्यामुळं याची आम्ही सत्यता जाणून घेतली...
याबद्दल अधिक माहिती त्वचारोगतज्ज्ञ देऊ शकतात...त्यामुळे आमचे प्रतिनिधी त्वचारोग तज्ज्ञांना भेटले...त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि खरंच फेअरनेस क्रीममुळं जीवाला धोका निर्माण होतो का...? याबद्दल अधिक माहिती जाणून घेतली...
नवनवीन क्रीममध्ये स्टेअरॉईड आणि पाऱ्याचं प्रमाण जास्त असतं...त्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय क्रीम वापरणं धोक्याचं ठरू शकतं...त्यामुळं काय काळजी घ्यावी हेदेखील जाणून घेतलं...
त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा...
- डॉक्टरांच्या सल्ल्याविना फेअरनेस क्रीम वापरू नका
- स्टेरॉईड्सयुक्त क्रीम आणि औषधे वापरल्याने त्याचा त्वचा आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होतो
- त्वचेवर पुरळ येणे, डाग येणे, त्वचेवर अधिक जाड केस येऊ लागणे, किडनी विकाराचा त्रास होतो
- त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याविना कोणतीचं फेअरनेस क्रिम आणि औषधं वापरू नये
- मेडिकल्समधून परस्पर क्रिम घेतांना त्यात स्टेरॉइड्स नाही, याची खात्री करून घ्यावी
- फेअरनेस क्रीम लावून उन्हात गेल्यानंतर त्रासही होतो...त्वचा गोरी होण्याऐवजी उलट खराबही होते...
त्यामुळं त्वचेला त्रास होऊ लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याविना परस्पर कोणतेही उपचार करू नये...
WebTittle : Fairness cream threatens lung, kidney?
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.