आज पाहा

VIDEO | कोल्ड्रिंक्स,आईसक्रीममुळे कोरोना व्हायरसचा धोका?

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे अनेकांनी जीव गमावलाय.त्यामुळं अपुरी माहिती देणारे मेसेज, व्हिडीओ व्हायरल होतायत.कोरोना व्हायरसमुळं जाग्यावरच मृत्यू होतो असाही दावा करणारा व्हिडीओ व्हायरल झालाय.त्यामुळं आम्ही व्हिडीओ आणि मेसेजची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.पण, व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहा.

कोणतंही पेय,आईसक्रीम,कुल्फी खाऊ नका.बंद डब्ब्यात ठेवलेलं जेवण,सीलबंद दूध,दूधापासून बनवलेली मिठाई 48 तासानंतर खाऊ नका.कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी हात साबणानं गरम पाण्याने धुवा


हा मेसेज व्हायरल होत असल्याने याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.चीनमध्ये कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातलाय.अनेकांनी जीवही गमावलाय.तर कित्येक जणांवर उपचार सुरू आहेत.भारतातही संशयित आढळून आल्याने यावर वेळीच आळा घालायला हवा.त्यामुळं या मेसेजमधील दावा कितपत खरा आहे.कोल्ड्रिंग, आईसक्रीम, बंद डब्यातील खाणं खाल्ल्याने कोरोनाचा धोका निर्माण होतो का हे जाणून घेतलं.कोरोना आजार हा संसर्गजन्य आहे...त्यामुळं कुठेही कोरोनाचा संशयित आढळला तर काळजी घेणं गरजेचं आहे...त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा...


कोरोना आजार हा संसर्गजन्य आहे. या आजाराचा आणि मेजेसमध्ये दावा केलेल्या बाबींचा थेट संबंध नाही.

कोरोना व्हायरसचे संक्रमण खोकला आणि इतर मार्गाने होत असतं.कोरोनाच्या संसर्गाबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने अजूनही मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत. 

कोरोनावर अजून सखोल संशोधन पूर्ण झालेलं नाही

थंड पेय आणि आईस्क्रीममुळे कोरोनोच्या संसर्गाबाबत निष्कर्ष निघालेले नाहीत


हा व्हायरस भारतातही आल्याचा दावा केल्यानं यावर संशोधन केलं जातंय...पण, तरीदेखील काळजी घेणं गरजेचं आहे...

WebTittle ::  Coldrinks, Corona Virus Risk Due to Ice Cream?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gharat Ganpati : 'घरत गणपती' २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर

MI Vs LSG : मुंबईचा प्लेऑफचा पत्ता जवळपास कट; लखनौचा मुंबईवर ४ गडी राखून विजय

Maharashtra Tourism: सूर्य आग ओकतोय! उष्णतेच्या झळा थंड हवेच्या ठिकाणांनाही, पर्यटकांनी फिरवली पाठ

Narendra Modi Exclusive : अभिजित पवार यांनी PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; देशभरासह महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर झाली चर्चा

India T20 World Cup Squad : किंग कोहलीवर विश्वास कायम, पंत आणि चहलचंही कमबॅक; टी-20 वर्ल्डकप टीमबाबत ५ महत्वाचे मुद्दे

SCROLL FOR NEXT