Cotton Price: कापसाचे दर अडीच हजारांनी घसरले

कापसाचे दर अडीच हजारांनी घसरले
Cotton Price
Cotton PriceSaam tv
Published On

यवतमाळ : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी नसल्याने कापसाचे दर उतरले आहेत. ऑक्टोंबरमध्ये सुमारे दहा हजार रुपये प्रति क्विंटलने सुरु झालेली कापूस (Cotton) खरेदी आता सात हजार पाचशे रूपये क्विंटलवर आली आहे. (Tajya Batmya)

Cotton Price
Political News: नाकर्तेपणा झाकण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर कीर्तन; खासदार सुजय विखे-पाटील यांची टीका

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात नऊ लाखाहून अधिक हेक्टरवर खरीप हंगामाची लागवड होती. गतवर्षी कपाशीला चांगला दर मिळाल्याने यंदा कपाशीकडे शेतकऱ्यांचा काहीसा ओढा होता. गतवर्षीनुसार यंदा देखील कापसाचे दर (Cotton Price) दहा हजाराच्‍या वर जातील; अशी अपेक्षा बळीराजाला होती. परंतु, ऑक्‍टोंबरमध्‍ये दहा हजाराच्‍या वर गेलेले दर खाली येत आहे. यामुळे बळीराजा (Farmer) संकटात सापडला आहे. तरी देखील मकरसंक्रांतीनंतर दर वाढतील अशी अपेक्षा आहे.

८० टक्‍के कापूस घरात

दरम्यान दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी बाहेरच काढलेला नाही. जिल्ह्यात ८० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान कापूस विक्री साठी येत नसल्याने जिनिंग चालक ही अडचणीत सापडण्याचे चित्र आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com