यवतमाळच्या शेतकऱ्यांचे टरबूज उत्पादनात नवे पाऊल

Yavatmal Melon farmer
Yavatmal Melon farmer

यवतमाळ : टरबूज Melon क्षेत्रात यवतमाळच्या Yavatmal शेतकऱ्यांनी पाऊल ठेवताच यशाचे नवीन दालन खुले झाले आहे. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी Farmers उत्तम आणि विविध रंगाचे टरबूज उत्पादित करून बाजारात आणले आहेत.  मात्र,  हे टरबूज उत्पादन लॉक डाउनमुळे अडचणीत आले आहेत.  हे टरबूज आहे ते निर्यात Export करू शकणाऱ्या गुणवत्तेचे आहे. पण सीम सील असल्याने हे टरबूज निर्यात होऊ शकले नाही. आता या शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे ती निर्बंध उठण्याची. Yavatmal Farmers producing new variety of melon

पण अशाही स्थितीत न डगमगता शेतकऱ्याने आपले टरबूज थेट ग्राहकांसाठी अगदी माफक दरात बाजारात उपलब्ध करून दिले आहे .राळेगाव तालुक्यातील पिंपरी दुर्गाचे शेतकरी अभिजित इंगोले यांनी तैवानचे एका खाजगी कंपनीचे बियाणे Seeds आपल्या शेतात लावले.

या उत्पादनाचे खास वैशिष्ट्य आहे. हे टरबूज इतर टरबूजापेक्षा हटके आहे. आपण साधारणपणे लाल टरबूज बघितले आहे. पण हे टरबूज आतून लाल आणि पिवळे आहे. हे टरबूज  रवाळ स्वरूपाचे पण खायला अत्यंत गोड आहे. या टरबुजाला विशेष नावे आहेत.सरस्वती , आरोही , मन्नत आणि विशाला. Yavatmal Farmers producing new variety of melon

अशा विविध प्रकाराची ही टरबूज ग्राहकांचे लक्ष वेधत आहेत. आतापर्यंत अभिजित यांनी १५ टन माल विकला पण अजूनही शेतात १७ ते १८ टन माल झाडावर शिल्लक आहे.  पण आता लागलेल्या लॉक डाउन Lock Down मुळे अभिजीतची चिंता वाढली आहे . असं असलं तरी अभिजीत यांनी हिम्मत सोडलेली नाही . इतर शेतकऱ्यांना पारंपारिक शेती सोडून नवीन पिकांकडे वळण्याचा सल्ला ते देत आहेत.
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com