अतिवृष्टीने नुकसान झालेल्या उर्वरीत शेतकऱ्यांना मदत कधी?
औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदत दिली जाईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र, प्रत्यक्षात दिवाळी सुरु झाली तरी मराठवाड्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालीच नाही. त्यामुळे मदत कधी मिळेल, बाजारात कधी जायचं आणि दिवाळी कधी साजरी करायची असा सवाल शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू म्हणणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांनी केलाय. (When to help the remaining farmers affected by heavy rains?)
हे देखील पहा -
मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील ५ लाख ७९ हजार ४३ शेतकऱ्यांपैकी दोन लाख ३८ हजार ३०६ शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात ३५.८६ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत वाटप करण्यात आली. उर्वरित ६४ टक्के शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ३० ऑक्टोबरपर्यंत केवळ १४.३७ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याची नोंद करण्यात आलीय. लातूर जिल्ह्यातील ७९.२० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्यात आली आहे. तर बीड जिल्ह्यात केवळ १३.२१ टक्के शेतकऱ्यांना मदतीचे वाटप झाले आहे. औरंगाबाद, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात नेमके किती शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम प्रशासनाने टाकली आहे, याची आकडेवारी अद्याप विभागीय आयुक्त कार्यालयाकडे आली नाही. आता त्यासाठी किती दिवस लागणार असा प्रश्न आहे.
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील ४७ लाख शेतकऱ्यांच्या ३६ लाख ६२ हजार ७८२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयाकडे करण्यात आलीय. राज्य सरकारने घोषित केलेल्या १० हजार कोटींच्या पॅकेजमधून मराठवाड्याच्या वाट्याला २ हजार ८२१ कोटी रुपये येणार आहेत. जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी १० हजार रुपये, बागायतीसाठी १५ हजार आणि फळपिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टरी मदतीची घोषणा सरकारने केली होती. प्रत्यक्षात किती मदत मिळेल हे शेतकऱ्यांना अद्याप कळू शकले नाही.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.