रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण; तहसीलदारांची गाडी पेटवली

रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. तुपकरांची प्रकृती खालावल्याने शेतकरी व कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी तहसीलदारांची गाडी पेटवली.
रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण; तहसीलदारांची गाडी पेटवली
रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण; तहसीलदारांची गाडी पेटवलीसंजय जाधव
Published On

बुलढाणा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांच्या 17 नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. मात्र आज आंदोलनाच्या चौथ्या दिवशीच आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. रविकांत तुपकर यांची तब्येत खालावल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी थेट बुलढाण्याच्या तलसीलदारांची गाडीच पेटवली. (Violent turn to Ravikant Tupkar's hunger strike; Tehsildar's car set on fire)

हे देखील पहा -

दरम्यान प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद नसल्याने कार्यकर्ते व शेतकरी आक्रमक झाले होते. काल आंदोलनस्थळी तुपकरांच्या निवासस्थानाबाहेर एका संतप्त कार्यकर्त्याने आपल्या अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला होता त्यामुळे एकच गदारोळ उडाला होता. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली आणि मलकापूर औरंगाबाद राज्य महामार्गावर रास्तारोको करत जोरदार घोषणाबाजी झाली, यावेळी पोलिसांच्या गाडीच्या काचा देखील फोडण्यात आल्या होत्या.

रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण; तहसीलदारांची गाडी पेटवली
'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांची धरपकड; आक्रमकतेनंतर सुटका

तारांबळ उडालेल्या प्रशासनाने सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. शेवटी काही कालावधीनंतर प्रकरण निवळले परंतु सद्यस्थितीत तुपकरांच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी करण्यात येत आहे. शेतकरी पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने तुपकरांच्या घरासमोर जमत आहे. सध्या तुपकरांच्या घरासमोर तणावपूर्ण शांतता आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com