Unseasonal Rain : अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका; जालना, नांदेडमध्ये फळबागांचे नुकसान

Jalna Nanded News : शेतकऱ्याने दीड हजार झाडांना पाणीटंचाईच्या काळात टँकरने पाणी देऊन बाग जगवली. मात्र हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा एकदा हिरावून घेतल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे
Unseasonal Rain
Unseasonal RainSaam tv
Published On

संजय सुरवंशी/ अक्षय गवळी 
नांदेड/ जालना
: राज्यात अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. प्रामुख्याने शेती पिकांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसत आहे. तर जालना व नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांपासून होत असलेल्या गारपीट व पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

आंब्याच्या बागेचे मोठे नुकसान 
जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला आहे. या बेमोसमी पावसाचा बीज कांदा पिकांसह फळबागांना फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे बदनापूर तालुक्यातील भराडखेडा या गावातील कैलास पालवे या शेतकऱ्याचे केशर आंब्याच्या बागेचे मोठ नुकसान झालं आहे. या शेतकऱ्याने दीड हजार झाडांना पाणीटंचाईच्या काळात टँकरने पाणी देऊन बाग जगवली. मात्र हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा एकदा हिरावून घेतल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. 

Unseasonal Rain
Jitendra Awhad : पाकिस्तानची मस्ती जिरवली गेलीच पाहिजे; ऑपरेशन सिंदूरनंतर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

नांदेडमध्ये वादळी वाऱ्यामुळे फळ बागेचे प्रचंड नुकसान
नांदेड
: नांदेड जिल्ह्यात काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः फळबागांचे यात प्रचंड नुकसान झाले आहे. तर नांदेड दक्षिणमध्ये देखील वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. नांदेड दक्षिण मधील बेट सांगवी, गंगाबेट, भंगी वाहेगाव, यासह इतर गावातील केळीच्या बागा वादळी वाऱ्यामुळे आडव्या झाल्या. केळी उत्पादक शेतकऱ्यांचे या वादळी वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान झाला आहे. 

Unseasonal Rain
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी १९ मेस होणार पुढील सुनावणी; बीडच्या विशेष न्यायालयात झाली सुनावणी

नुकसान भरपाईची मागणी 

दरम्यान नांदेडमध्ये झालेल्या नुकसानग्रस्त भागाची शिवसेनेचे आमदार आनंद बोंढारकर यांनी पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे आनंद बोंढारकर यांनी सांगितले. तसेच जालन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com