बुलढाणा जिल्ह्यात आर्थिक विवंचनेतून तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या!

हे तीनही शेतकरी अल्पभूधारक होते.
Suicide
SuicideSaam Tv

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील तीन अल्पभूधारक शेतकऱ्यांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्याने जिल्ह्यात (Buldhana) खळबळ उडाली आहे, देऊळगांवराजा तालुक्यातील दोन तर सिंदखेडराजा तालुक्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.

हे देखील पहा :

देऊळगांवराजा (Deulgaonraja) तालुक्यातील बायगाव येथील 50 वर्षीय दगडू पुंजाजी धोरवे या शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. तर गारगुंडी येथील 42 वर्षीय अशोक त्र्यंबक आंधळे या दोन्ही शेतकऱयांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच शिंदी येथील अनंता व्यंकट खरात या 35 वर्षीय तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

Suicide
Russia Ukraine War : खारकिव्ह मध्ये अडकलेल्या मुलांचे प्रचंड हाल, आई वडील चिंतेत!

हे तीनही शेतकरी (Farmers) अल्पभूधारक होते. सततची नापिकी व वाढता कर्जाचा डोंगर याने सतत चिंतेत होते, कर्ज कसे फेडावे या चिंतेने त्यांनी स्वतःची जीवनयात्रा संपविली आहे. त्यामुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com