कडक उन्हाचा केळीच्या पिकाला फटका; अकोल्यात केळीची बाग सुकल्याने शेतकरी हतबल

Akola Agriculture News : वाढत्या तापमानाने विहिरीची पाणी पातळी खोल गेली असून परिसरातील केळी बागा आणि भाजीपाल्याची पिके सुकली आहेत.
The rising temperature dried the bananas In Akola
The rising temperature dried the bananas In Akolaजयेश गावंडे
Published On

अकोला: राज्यात वाढत्या तापमानाचा फटका शेतीलाही बसतोय. अकोल्यात पारा ४५ डिग्रींवर गेल्याने याचा फटका फळ पिकाला सर्वाधिक बसलाय. तापमानामुळे (Heat Wave) केळीचे पीक (Banana Crop) सुकत आहेत. अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील दानापूर परिसरात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दरवर्षी उन्हाळ्यात सर्वाधिक फटका या पिकाला बसत असल्याने शेतकरी हतबल झालाय. (The summer hit the banana crop; The rising temperature dried the bananas in AKola)

हे देखील पाहा -

दानापूरसह परिसरात केळी बागा सुकल्या, तर विहिरींनी तळ गाठलाय. अकोला (Akola) जिल्ह्यात या महिन्यात तापमानाने कळस गाठला असून तापमान ४५ अंशावर गेले आहे. दानापूर परिसरातील पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. वान प्रकल्पाचा मोठा फायदा दानापूर, वारखेड, वारी, सोगोडा, सौंदळा, हिंगणी, रायखेड, चांगलवाडी या गावांना होतो. मात्र या वर्षी तापमानाने उच्चांक गाठल्याने परिसरातील विहिरी, बोअरवेल यांनी तळ गाठला असून याठिकाणी भाजीपाला वर्गीय पिकांच्या सोबत, गहू, हरभरा, कपाशी, सोयाबीन आदी पिके घेतली जातात. सोबतच केळी व संत्रा पिकेही मोठया प्रमाणावर घेतली जातात. मात्र यावर्षी वाढत्या तापमानाने विहिरीची पाणी पातळी खोल गेली असून परिसरातील केळी बागा आणि भाजीपाल्याची पिके सुकली आहेत.

The rising temperature dried the bananas In Akola
फॉरेनची पाटलीन ! श्रीलंकेचं वऱ्हाड गोंदियामध्ये !

शेतात काम करणाऱ्या मजुरांना घरून पिण्यासाठी पाणी नेण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. दरम्यान केळीचे पीक उन्हामुळे हातून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नियमित आणि चांगला पावसाळा झाला तरच या परिसरातील शेतीला फार मोठा फायदा होणार आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com