कोराडी नदीला पुर आल्याने शेत जमीनी खरडल्या; नुकसान भरपाईची मागणी

कोराडी नदीला पुर आल्याने नादिकाठच्या हजारो हेक्टर वरील शेत जमीनी खरडल्या आहेत.
कोराडी नदीला पुर आल्याने शेत जमीनी खरडल्या; नुकसान भरपाईची मागणी
कोराडी नदीला पुर आल्याने शेत जमीनी खरडल्या; नुकसान भरपाईची मागणीसंजय जाधव
Published On

संजय जाधव

बुलढाणा - कोराडी नदीला Koradi River पुर Flood आल्याने नदीकाठच्या हजारो हेक्टर वरील शेत जमीनी खरडल्या आहेत.तसेच गजरखेड ते सवडत दरम्यान असलेला पुल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून नवीन पुल बांधून देण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हे देखील पहा -

तसेच नदीकाठच्याअसंख्य शेतकऱ्यांच्या शेत जमीनी खरडून गेल्या आहेत त्यांमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे.आता तातडीने पंचनामे करुण आर्थिक मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्ह्याधिकारी यांच्या सह पालकमंत्री डॉ, राजेंद्र शिंगणे Rajendra Shingne यांच्या कडे केली आहे.

कोराडी नदीला पुर आल्याने शेत जमीनी खरडल्या; नुकसान भरपाईची मागणी
मावळात भात लागवडीस जोमात सुरवत

विभागाच्या तलाठी, मंडळ अधिकारी तसेच कृषी विभागाला स्थळ निरीक्षण करुण पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अहवाल प्राप्त होताच जिल्ह्याधिकारी यांच्यकडे सादर करण्यात येईल व शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याचे आश्वासन तहसीलदार सावंत यांनी दिले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com