Sujat Ambedkar News : ...अन्यथा खतांच्या गाेदामांचा ताबा वंचित बहुजन युवा आघाडी घेईल : सुजात आंबेडकरांचा सरकारला इशारा

अकाेल्यातील शेतक-यांना न्याय मिळवून देणार असल्याचे सुजात आंबेडकर यांनी नमूद केले.
Sujat Ambedkar
Sujat Ambedkarsaam tv

- हर्षदा सोनोने

Akola News : शेतीसाठी आवश्यक असलेल्या खंताची कृत्रिम टंचाई निर्माण करुन ती खते चढ्या भावाने विकल्या जात असल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी ह्या शेतकऱ्यांनी वंचित बहुजन युवा आघाडीकडे केल्या हाेत्या. या तक्रारींनूसार प्रशासनाने शेतक-यांना खतांची उपलब्धतता करुन द्यावी अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडी गाेदामाचा ताबा घेईल असा इशारा कृषी विभागास दिला. (Maharashtra News)

Sujat Ambedkar
Life Imprisonment : पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला आजन्म कारावास, वाचा नेमकं काय घडलं हाेतं आठवडी बाजारपेठेत

वंचित बहुजन आघाडीचे युवानेते सुजात आंबेडकर यांच्यासह वंचित बहुजन युवा आघाडीचे कार्यकर्ते यांनी अकोला जिल्हा कृषी अधिकारी किरवे यांची भेट घेतली. "अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासन व प्रशासनाला अजुन जाग आली नाही का...? की फक्त खोटी आश्वासने ह्या त्रिकुट सरकार देत आहे असा सवाल विचारला.

Sujat Ambedkar
Amit Shah Pune Visit : अमित शहांचा उद्या पुणे दाैरा, जाणून घ्या वाहतुकीतील बदल

शेतकऱ्यांच्या (farmers) नुकसान संदर्भात दिली असतांनाच त्यात शेतीसाठी आवश्यक असलेल्या खंताची मोठ्या प्रमाणात गोडाऊनमधे माल साठवून कृत्रिम टंचाई निर्माण केली आहे. या टंचाईचा फायदा घेत अनेक कृषी सेवा केंद्रावाल्यांनी खतांची चढ्या भावाने विक्री करुन हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या खिश्यावर दरोडा टाकल्यासारखा प्रकार करत आहे.

Sujat Ambedkar
Arrest Sambhaji Bhide : अटक करा... अटक करा... संभाजी भिडेंना सात दिवसांत अटक करा...

हा प्रकार आपण आपल्या स्तरावरून आदेशित करुन तात्काळ थांबवावा व साठवणुक केलेल्या खताला शेतकऱ्यांना शासकीय किमतीत उपलब्ध करून देण्यात यावा अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी हे गोडाऊनवर ताबा करून शेतकऱ्यांना स्वतः खते वाटप करेल असा अल्टिमेटम जिल्हा कृषी अधिकारी किरवे यांना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com