Latur: शॉर्टसर्किटने ऊसात आग; 3 एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान...

Short Circuit In Sugarcane Farm in Latur: आधीच शेतकरी हे वेगळ्या संकटाने कोलमडून गेला असून आता शॉर्टसर्किटमुळे या शेतकऱ्यांचा ऊस जळाल्याने त्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
Short Circuit In Sugarcane Farm in Latur
Short Circuit In Sugarcane Farm in Laturदीपक क्षीरसागर
Published On

लातूर: चाकूर तालुक्यातील आटोळा येथील शेतकरी पंडित रामराव शेटे यांच्या शेतात शॉर्टसर्किटमुळे ऊसाला आग लागून सरासरी चार लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती शेतकरी पंडीत शेटे यांनी दिली आहे. शेटे यांच्या शेतातून गेलेल्या विजेच्या ताराला शॉर्टसर्किट (Short Circuit) होऊन गट नंबर ४३ मधील तीन एकर ऊस जळाला असून पंडित शेटे त्यांचे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतातील पोलवरील वायर एकमेकांना घर्शन होऊन आग लागल्याने तीन एकर उसाचे (SugarCane) नुकसान झाले असल्याची शेतकर्‍यांनी माहिती दिली आहे. यामुळे त्यांचे सरासरी चार लाख रुपयांचे नुकसान झाले असून झालेल्या नुकसानीची भरपाई महावितरणने (Mahavitaran) द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. (Short circuit fire; 3 acres of sugarcane burnt to ashes, farmers lose millions in latur)

हे देखील पहा -

Short Circuit In Sugarcane Farm in Latur
अल्पभूधारक शेतकऱ्यांने अशी केली शेती ओलीत; हायवेवरून ये-जा करणाऱ्याचे वेधले लक्ष

आधीच शेतकरी हे वेगळ्या संकटाने कोलमडून गेला असून आता शॉर्टसर्किटमुळे या शेतकऱ्यांचा ऊस जळाल्याने त्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे महावितरणने या शेतकऱ्यांला तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. पंडित शेटे यांच्या ऊसाला आग लागल्याची माहिती मिळताच काशिनाथ गंगापूरे, संगमेश्वर गंगापूरे, बंडाप्पा गंगापूरे, कचरू शेटे, शिवाजी पाटील, सचिन पाटील, महमूद मुजेवार, ईश्वर पाटील, सय्यद दरोगे, लालू बेग, नारायण सावंत, शिवाजी रावळे, समीर बेग, बुऱ्हाण शेख, शाम शेटे, ओमकार शेटे, मधू गंगापूरे, महेश पाटील, प्रदीप पाटील, संजय गंगापूरे ,शंकर गंगापूरे, शिदेश्वर शेटे, ओंकार गंगापूरे आदी नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगेने रूद्र रूप धारण केल्याने आग आटोक्यात आणता आली नाही. उसाला आग लागून नुकसान झाले असल्याची माहिती पंडीत शेटे यांनी महसुल प्रशासनास कळवले असता तलाठी परमेश्वर माने यांनी येऊन स्थळ तपासणी करून पंचनामा केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com