Shahapur News : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; आचारसंहितेमुळे भरपाई कोण देणार?, दिवाळीच्या तोंडावर शेतकरी चिंतेत

Shahapur News : मागील आठवडाभरापासून राज्यात परतीचा पाऊस होत आहे. यामुळे प्रचंड फटका बळीराजाला बसत आहे.
Shahapur News
Shahapur NewsSaam tv
Published On

फैय्याज शेख 

शहापूर : राज्यात सध्या सतत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. दररोज वादळीवाऱ्यासह येणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. शेतातून मुठभर धान्य घरात येणार नसल्याची अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. कुषी विभागा मार्फत पंचनामे करून भरपाई मिळावी असी मागणी शेतकरी करत आहे.

मागील आठवडाभरापासून राज्यात परतीचा (Rain) पाऊस होत आहे. यामुळे प्रचंड फटका बळीराजाला बसत आहे. ठाणे (Thane) जिल्ह्यातील ग्रामीण भागात दररोज दुपारनंतर परतीचा पाऊस हजेरी लावत आहे. हा परतीचा पाऊस साधासुधा पडत नसून वादळीवाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पडत असल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या भात, नागली, वरी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचून असल्याने पीक पूर्णतः सडून गेले आहे. 

Shahapur News
Marathwada Rain : मराठवाड्यात परतीच्या पावसाने दाणादाण; मका- सोयाबीनला फुटले कोंब, शेतकऱ्यांना आर्थिक फटका

ऐन दिवाळीच्या तोंडावर हे नुकसान होत असून दिवाळीत घरात येणारे धान्य पावसामुळे शेतात कुजत आहे. यामुळे मुठभर देखील धान्य घरात येणार नसल्याची खात्री आता शेतकऱ्यांना झाली आहे. वर्षभराची मेहनत वाया गेली. त्यात विधानसभेच्या निवडणूक यामुळे शेतकऱ्यांनी भरपाई कोणाकडे मागायची हा प्रश्न उपस्थित राहीला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com