Sangli News
Sangli NewsSaam tv

Sangli News : गाईच्या कळपाकडून द्राक्षबागांसह भाजीपाल्याचे पीक भुईसपाट; शेतकऱ्याचे तीन लाखाचे नुकसान

Sangli Grapes Farm : रस्त्यावर मोकाट जनावरांचा त्रास वाढलेला आहे. मात्र सांगलीच्या बेळंकी या गावात जंगली गायींनी हैदोस घातला आहे. शेतशिवारात आलेल्या या गायींचा कळप शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे.
Published on

सांगली : मोकाट जनावरांचा त्रास रस्त्यावर भेडसावत असतो. दरम्यान सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या बेळंकी येथे मोकाट गाईंचा कळप द्राक्षबागसह भाजीपाल्याचा शेतात गेल्याने बाग उध्वस्त केल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये उमेश खोत या शेतकऱ्याचं सुमारे दोन ते तीन लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

रस्त्यावर मोकाट जनावरांचा त्रास वाढलेला आहे. मात्र सांगलीच्या बेळंकी या गावात जंगली गायींनी हैदोस घातला आहे. शेतशिवारात आलेल्या या गायींचा कळप शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. असाच प्रकार सांगली जिल्ह्यात घडला असून जिल्ह्यातील बेळंकी गावा लगत असणाऱ्या सलगरेच्या कुरणामध्ये सुमारे १०० ते १५० जंगली गायांचा कळप आला आहे. या कळपाकडून द्राक्ष बागा व भाजीपाल्याची शेतीचे नुकसान केली आहे. 

Sangli News
Cotton Price : कापसाला १२ हजार प्रति क्विंटल भाव देण्याची मागणी; शेताच्या बांधावर कापूस जाळून आंदोलन

विक्रीसाठी आलेल्या एक एकर द्राक्षबागेत हैदोस घालत मोकाट गायांच्या कळपाने तयार झालेल्या द्राक्ष घडांची मोठी नासधूस केली आहे, त्याचबरोबर खोत यांच्या द्राक्षबागाच्या शेजारीच असणारे घेवडा व चवाळी शेंगाचा आणि भाजीपाल्याचा प्लॉट देखील मोकाट गाईंच्या कळपाने अक्षरशः भूईसपाट केला आहे. यात साधारण दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

Sangli News
Cyber Crime : आयटी अभियंत्याची जादा नफ्याच्या आमिषातून फसवणूक; परदेशातील संशयितासह एकजण ताब्यात

या गायीच्या कळपामुळे अनेक वेळा अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. यावेळी खोत यांच्या द्राक्ष बागेसह भाजीपाल्यांचे गायींच्या काळपाने मोठे आर्थिक नुकसान केलं आहे. या नुकसान प्रकरणी पंचनामा करून तातडीने मदत द्यावी आणि वन विभागाकडून या गाईंचा बंदोबस्त करावा; अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com